29 April 2024 1:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

Health First | कान स्वच्छ करण्याची नैसर्गिक पद्धत माहित आहे का? - वाचा सविस्तर

Natural way to clean ears

मुंबई, ३१ मे | कानात मळ साचणे ही सामान्य बाब आहे. ही सर्वांसह होते.वेळोवेळी कानाची स्वच्छता करणे देखील आवश्यक आहे. स्वच्छता न झाल्यास कान दुखणे, खाज होणे,जळजळ होणे, किंवा बहिरेपणा सारख्या समस्या उद्भवू शकतात. कानात मळ जमणे ही तशी सामान्य गोष्ट पण कान वेळोवेळी साफ करणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. कान साफ न केल्यास खाज येणे, जळजळ किंवा इतर अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं.

कान स्वच्छ करण्यासाठी या टिप्स जाणून घ्या.

कोमट पाणी:
कापसा च्या साहाय्याने पाणी कोमट करून कानात घाला. कान थोडा काळ तसाच राहू द्या आणि काही सेकंदांनंतर, कान उलट करा आणि पाणी बाहेर काढा. कान स्वच्छ करण्याची ही सर्वात सोपी पद्धत आहे.

हायड्रोजन पॅरॉक्साइड:
अतिशय कमी प्रमाणात हायड्रोजन पराक्साइड घेवून तो पाण्यात टाका. थोड्या प्रमाणात ते कानात टाका आणि आता कान उलटून काही सेकंदात ते बाहेर काढा.

तेल:
ऑलिव, शेंगदाणा किंवा मोहरीच्या तेलात थोडासा लसूण घालून तळून घ्या . आता हे तेल कोमट असल्यास ते कापसाच्या साहाय्याने कानात घालून कान झाकून ठेवा. असं केल्याने कानाची घाण सहजपणे बाहेर येईल.

कांद्याचा रस:
कांदा शिजवून किंवा तळून घेऊन रस काढा. आता ड्रॉपर किंवा कापसाच्या मदतीने कांद्याच्या रसातील काही थेंबा
कानात घाला. हे कानातील घाण सहजपणे बाहेर काढेल.

मिठाचे पाणी:
गरम पाण्यात मीठ मिसळून घोळ तयार करा. आता या घोळा चे काही थेंब कापसाच्या मदतीने कानात घाला आणि नंतर कान उलट करून घ्या. परंतु हे लक्षात ठेवा की कान दुखणे किंवा कोणत्याही खरुज आणि जखमा झाल्यास ही पद्धत अवलंबू नका.

महत्वाची सूचना: घरगुती उपचारातील प्रकारात मोडणारे हे प्रकार फायद्याचे असले तरी प्रथम संबंधित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन वैज्ञानिक कृतीद्वारे सिद्ध झालेले उपचार घ्यावे हा सल्ला आहे.

 

News English Summary: Accumulation of feces in the ears is common. It happens with everyone. It is also necessary to clean the ears from time to time. Lack of hygiene can lead to problems such as ear pain, itching, burning, or deafness. Earwax is common, but it is just as important to clean your ears from time to time. Failure to clean the ear can lead to itching, inflammation, and many other problems.

News English Title: Natural way to clean ears health article news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x