5 May 2024 12:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Health Insurance Premium | हेल्थ इन्शुरन्स घेणाऱ्यांना धक्का! 10 ते 15 टक्क्याने वाढणार पॉलिसी प्रिमिअम Gold Rate Today | अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदीच विचार आहे? तनिष्क, मलबार ज्वेलर्स आणि कल्याण ज्वेलर्सचे दर जाणून घ्या Govt Employee Pension | सर्व पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट! SBI सहित 5 सरकारी बँकेत नवीन सुविधा सुरु, फायदा घ्या 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! HRA पासून ग्रॅच्युइटीपर्यंत फायदा, मोठी वाढ होणार Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा
x

बेळगावला कर्नाटकच्या दुसऱ्या राजधानीचा दर्जा, महाराष्ट्र सरकार काय निर्णय घेणार?

बंगळुरू : कर्नाटकच्या कुमारस्वामी मंत्रिमंडळाने बेळगावला दुसऱ्या राजधानीचा दर्जा देण्याचा आणि कर्नाटक सरकारची आस्थापने बेळगावला वर्ग करण्याचा प्रस्ताव मांडल्याचे वृत्त आहे. कर्नाटक सरकारच्या या हालचालींमुळे सीमाभागात रोष व्यक्त करण्यात येत आहे. परंतु महाराष्ट्र सरकार यावर काय निर्णय घेणार ते महत्वाचं ठरणार आहे.

कर्नाटक सरकारकडून बेळगावमधील विकासाला चालना देण्यासाठी बेळगावला कर्नाटकाची दुसरी राजधानी करण्याचा प्रस्ताव गेली १२ वर्षे विचाराधीन होता. या विषयावर बोलताना विद्यमान मुख्यमंत्री म्हणाले की,’ मी २००६ मध्ये मुख्यमंत्री झालो तेव्हापासून बेलगावीला दुसऱ्या राजधानीचा दर्जा देण्याचा प्रस्ताव प्रलंबित होता. माझ्या नंतरच्या इतर सरकारांनी या प्रस्तावाचा अजिबात विचार केला नाही. परंतु आता मी पुन्हा या प्रस्तावाचा व तो अमलात आणता येईल का याचा गांभीर्याने विचार करत आहे’, असं कुमारस्वामी म्हणाले.

पुढे कुमारस्वामी म्हणाले की,’ बेलगावीमध्ये काही सरकारी खाती सुरू करण्याचा आपला विचार असून लहान सहान कारणांसाठी कलबुर्गी, धारवाड, हुबळी इथल्या लोकांना बेंगळूरला यावं लागू नये असं त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं. सीमाभागातल्या मराठी भाषिकांची गळचेपी तसेच शाळांमध्ये कानडीची सक्ती या सारख्या अनेक गोष्टी इथल्या मराठी जनतेवर लादण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुन्हा सीमाभागात कानडी-मराठी असं वाद पुन्हा उफाळून येण्याची चिन्ह आहेत.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x