29 April 2024 11:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 30 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार?
x

उत्तर प्रदेश निवडणूक | सहकारी पक्षांनाही पराभवाचे संकेत मिळाले? | म्हणाले भाजप म्हणजे ‘डूबती नैया’

Uttar Pradesh Assembly Election 2022

लखनऊ, ११ जून | उत्तर प्रदेशात पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षासोबत इतर स्थानिक पक्ष देखील कामाला लागले आहेत. मात्र सध्या कोरोना आपत्ती सारख्या विषयांमुळे यूपीत भाजपाला आणि आरएसएसला पराभवीचे संकेत मिळाल्याने सतर्कता बाळगण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी छोट्या जुन्या सहकारी पक्षांना सोबत घेण्यासाठी सुरुवात झाली आहे. परंतु त्यांना देखील भाजपच्या पराभवाचे संकेत मिळत आहेत का अशी चर्चा रंगली आहे.

कारण याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष हा बुडते जहाज असून, आम्ही त्यांचे सहप्रवासी होऊ शकत नाही, असे ओम प्रकाश राजभर यांनी जाहीर केले आहे. भारतीय जनता पक्षाने अन्य लहान पक्षांना सोबत घेण्यासाठी रणनीती तयार केल्याचे सांगितले जात आहे. अपना दल आणि निषाद पक्षासह सुहेलदेव भारतीय समाज पक्षाला भारतीय जनता पक्षाने साद घातली होती. परंतु, सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे नेते ओम प्रकाश राजभर यांनी याला विरोध दर्शवला असून, भारतीय जनता पक्षासोबत युती करणार नसल्याचे जाहीर केले आहे. या संदर्भात राजभर यांनी एक ट्विट करून माहिती दिली आहे.

भारतीय जनता पक्ष हे एक बुडते जहाज आहे. ज्यांना त्यांच्यासोबत जायचे आहे, त्यांनी जावे. पण आम्ही जाणार नाही. जेव्हा निवडणुका जवळ येतात, तेव्हाच भारतीय जनता पक्षाला लहान पक्ष आणि मागासवर्ग समाजाची आठवण होते. परंतु, जेव्हा मुख्यमंत्रीपदाची चर्चा केली जाते, तेव्हा बाहेरून माणसे आणली जातात. केवळ मतांसाठी भारतीय जनता पक्ष मागासवर्ग समाजाला जवळ करते. ज्या मुद्द्यावर गेल्या वेळेस युती झाली होती. ते मुद्दे अजूनही प्रलंबित आहेत, असा दावा राजभर यांनी केला आहे.

 

News Summary: The Bharatiya Janata Party is a sinking ship and we cannot be its companion,” said Om Prakash Rajbhar. The Bharatiya Janata Party is said to have devised a strategy to bring other smaller parties along. Suheldev Bharatiya Samaj Party along with Apna Dal and Nishad Party was called by Bharatiya Janata Party. However, Suheldev Bharatiya Samaj Party leader Om Prakash Rajbhar opposed the move and said he would not form an alliance with the Bharatiya Janata Party. Rajbhar has given information in this regard through a tweet.

News Title: Uttar Pradesh Assembly Election 2022 Om Prakash Rajbhar declared no question alliance with BJP over election news updates.

हॅशटॅग्स

#UttarPradeshAssemblyElection2022(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x