29 April 2024 2:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

Family First | या चुकांमुळे नाती दुरावतात, अशी चूक करू नये - वाचा सविस्तर

Relationship matter

मुंबई, ११ जून | नाते तेव्हा तुटते किंवा दुरावते, जेव्हा नकारात्मक बाजूंवर आपले लक्ष केंद्रित होते. कालपर्यंत जीवश्च कंठश्च वाटणारी व्यक्ती एकएक डोळ्यासमोरही नकोशी वाटू लागते. या गोष्टी एका रात्रीत घडतात का? तर नाही. वाईट गोष्टी एकाशी एक जमा होत जातात आणि त्याचा डोंगर एवढा वाढतो, की पलीकडचे चांगले काही दिसेनासे होते. म्हणून नाते तोडण्याआधी एक क्षण थांबून स्वतःला विचारा, की इतके दिवस आपण हे नाते का जपले? तरीही उत्तर मिळत नाहीत.

नाती बनविणे खूप सोपे आहेत पण त्यांना जपून ठेवणं खूपच कठीण आहे. जर आपल्याकडून कधी काही चूक झाली असेल तर ती स्वीकारून शक्य असल्यास तशी चूक करू नका. जेणे करून नातींमध्ये गोडवा टिकून राहील.परंतु काही लहान लहान चुका अशा असतात ज्यांच्या मुळे नाती दुरावतात किंवा तुटतात.चला तर मग जाणून घेऊ या की कोणत्या आहे त्या चुका ज्यांच्या मुळे नाती दुरावतात.

1. दबाब आणणे:
आपण आपल्या जोडीदारावर पुन्हा -पुन्हा बोलण्यासाठी दबाब आणता . ती किंवा तो कामात असल्यावर त्यांना वारंवार बोलण्यासाठी बाध्य केले जाते ज्या मुळे ते वैतागतात. असं करणं अजिबात योग्य नाही. सगळ्यांची आपापली कामे असतात ज्यामुळे प्रत्येक जण व्यस्त असतो अशा कामाच्या वेळी त्याला त्रास देणं चांगले नाही तो किंवा ती काम संपल्यावर आपल्याशी बोलेलच परंतु कामात असताना त्रास देणं आणि त्यांना पुन्हा पुन्हा बोलण्यासाठी दबाब देणं चुकीचं आहे या मुळे नात्यात दुरावा येऊ शकतो.

2. संशय घेणं:
संशय करणं म्हणजे प्रेमात मीठ पडणं . जर आपल्या जोडीदाराचा फोन बिझी येत असेल तर असा विचार करू नका की तो किंवा ती इतर कोणाशी बोलत आहे. फोन ऑफिसचा किंवा कामाचा देखील असू शकतो. अशा परिस्थितीत त्यांच्या वर संशय घेऊन जाणीव करून देऊ नका की त्याच्या वर किंवा तिच्यावर आपला विश्वास नाही.

3. भूतकाळावर बोलणं:
आपण आपल्या जोडीदाराला वारंवार भूतकाळाची आठवण करून दिल्यावर भविष्यात समस्या उदभवू शकते. असं करू नका जर भूतकाळात घडलेल्या चुकीचे वारंवार बोलले गेले आणि त्यामुळे भागीदाराला खाली बघत असाल तर हे चुकीचे आहे असं करू नका. या मुळे नात्यात दुरावा येऊ शकतो.

4. रागावणे:
जर आपल्या जोडीदाराला आपली गरज आहे आणि आपण उगाच रागावता किंवा चिडचिड करता तर हे पूर्णपणे चुकीचे आहे. राग आणि चिडचिड कोणाला ही होऊ शकते. अशा परिस्थितीत जेव्हा त्याला किंवा तिला सर्वात जास्त आपली गरज आहे तेव्हा त्याला किंवा तिला समजून घ्या आणि प्रेमाची वागणूक द्या. अशा वेळी जर आपण राग करता तर असं करू नका हे चुकीचं आहे. या मुळे जोडीदारास त्रास होऊ शकतो.

5.सकारात्मक बाजू पहा:
एखाद्यावर दोषारोप करताना आपल्याकडे समोरच्याच्या चुकांची पूर्ण यादीच तयार असते. परंतु म्हणतात ना, कोणतीही व्यक्ती पूर्ण चूक आणि पूर्ण बरोबर असूच शकत नाही. म्हणून काही काळ चुकांची यादी बाजूला ठेवून गुणांवर लक्ष केंद्रित करा आणि चक्क लिहून काढा. एखादी व्यक्ती आवडते तेव्हा आपल्याला फक्त तिचे गुण दिसतात आणि नावडते तेव्हा फक्त दोष! परंतु एखाद्याला आपले मानल्यावर गुण दोषांसह त्या व्यक्तीचा स्वीकार करता यायला हवा.

 

News Summary: Relationships break up or fall apart when you focus on the negative. Till yesterday, a person who seems to have a life-threatening voice starts to feel disgusted even in front of one’s eyes. Do these things happen overnight? If not. The bad things accumulate one by one and its mountain grows so much that some of the good things on the other side disappear. So before you break up, stop for a moment and ask yourself, why have you been in this relationship for so long? Still no answers. It is very easy to make grandchildren but it is very difficult to take care of them.

News Title: Relationship matter in personal life family first news updates.

हॅशटॅग्स

#FamilyFirst(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x