कोरोनाची तिसरी लाट धोकादायक | लहान मुलांसाठी आयुष मंत्रालयाची गाईडलाईन जारी

मुंबई, १७ जून | कोरोना महामारीच्या पहिल्या आणि दुसर्या लाटेमुळे कित्येक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर कोट्यवधी लोक कोरोनाच्या विळाख्यात सापडले आहे. द इकॉनॉमिस्टच्या अहवालानुसार, जगभरात कोरोनामुळे 70 लाख 1.3 कोटी मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. टेस्टिंग आणि रिपोर्टिंगच्या कमतरतेमुळे मृत्यूंच्या अधिकृत आकडेवारीत मोठी तफावत असल्याची शक्यतादेखील वर्तवली जात आहे. कोरोनाची खरी आकडेवारी सरकारने लपवली असून यामध्ये आफ्रिका, आशियाच नव्हे तर अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स देशांचादेखील समावेश आहे. कोरोनाच्या खबरदारीमुळे फ्लू आणि अन्य कारणांमुळे होणारे मृत्यू कमी झाल्याचे अहवालात समोर आले आहे.
दुसरीकडे सरकारने ठरवलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन न झाल्यास येत्या एक-दोन महिन्यात राज्यात कोरोनाची तिसरी लाट येणार. ही शंका राज्य सरकारने नियुक्त केलेल्या कोरोना टास्क फोर्सने व्यक्त केली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत आढावा घेण्यासाठी बुधवारी बैठक झाली. यात कोरोनाचा “डेल्टा प्लस” म्हणजेच AY.1 व्हेरिएंटमुळे राज्यात तिसरी लाट येण्याचा धोका मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आला आहे.
दरम्यान, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर लहान मुलांच्या बचावासाठी गाईडलाईन जारी करण्यात आली आहे. त्यात लहान मुलांची इम्युनिटी वाढवण्यावर अधिक जोर देण्यात आला आहे.
आयुष 64चा वापर:
गाईडलाईननुसार लहान मुलांचं त्यांच्या वयानुसार वर्गीकरण करण्यात आलं आहे. त्यात 10 ते 15, 5 ते 10 आणि 5 वर्षापासून त्या खालील मुलांचे गट निर्माण केले आहेत. मुलांना या वयोगटानुसारच औषध देण्यास सांगण्यात आलं आहे. ताप आला तर आयुष 64 हे औषध देण्याचं गाईडलाईनमध्ये नमूद करण्यात आल्याचं राजगोपाल यांनी सांगितलं.
आयुर्वेद बिहेविअर प्रोटोकॉल
मोठ्या माणसांप्रमाणेच लहान मुलांनीही बिहेविअर प्रोटोकॉलचा वापर सुरू करावा, असं गाईडलाईनमध्ये म्हटलं आहे. त्यानुसार आई-वडिलांना आयुर्वेदिक औषधांचा खास वापर करण्यास सांगण्यात आलं आहे. तसेच कोमट पाण्याने गुळण्या करण्याचा सल्लाही लहान मुलांना देण्यात आला आहे, असं राजगोपाल यांनी स्पष्ट केलं.
लहान मुलांकडे लक्ष द्या
आयुष मंत्रालयाच्या गाईडलाईनमध्ये लहान मुलांच्या हालचालींकडेही लक्ष देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. केवळ तापच नव्हे तर मुलांची अॅक्टिव्हिटी कमी झाली तरी तात्काळ डॉक्टरांना दाखवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
मोहरीच्या तेलाचा वापर
गाईडलाईनमध्ये मोहरीच्या तेलाचा वापर करणे बंधनकारक केलं आहे. मोहरीचं तेल कोरोना संरक्षण कवच म्हणून काम करत असल्याचा दावा केला जात आहे. या तेलामुळे नाकातून कोरोनाचा संसर्ग होत नसल्याचंही बोललं जात आहे. लहान मुलांना या तेलाचा दररोज वापर करण्यास सांगण्यात आलं आहे.
मुलं एकटी राहू नयेत
कोरोनाचा संसर्ग झाल्यावर रुग्णांना साधारणपणे आयसोलेशनमध्ये पाठवलं जातं. अशावेळी लहान मुलांना आयसोलेट केलं तर त्यांच्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो. त्यामुळे लहान मुलांवर विशेष लक्ष देण्यास सांगण्यात आलं आहे. त्यासाठी आयुष मंत्रालयाने पालकांसाठी वेगळी गाईडलाईन जारी केली आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.
News Title: Union Ayush Ministry issued guidelines to protect children from Covid 19 news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
JP Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक फोकसमध्ये; यापूर्वी 2004 टक्के परतावा दिला - NSE: JPPOWER
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची भरारी; ग्लोबल फर्मकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये तेजीचे संकेत; मिळेल मजबूत परतावा - NSE: ADANIPOWER
-
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN