मुंबई, १९ जून | भारतीय जनता पक्षाचे खासदार रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर या दोघांचा वाद काही नवीन नाही. पोलिसांनी जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथील भाजप कार्यालयाची झडती घेतल्याने केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांच्या तक्रारीवरून पाच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आलं होतं. दरम्यान, पोलिसांचे निलंबन आज मागे घेण्यात आलं असून, पोलिसांवरील ही कारवाई मागे घेतल्याने अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यात पुन्हा वाद निर्माण झाला आहे.
नेमकी काय घडली होती घटना?
११ जून रोजी एका पत्रकाराला मारहाण करण्यात आली होती. या झालेल्या मारहाणीचा तपास करत पोलीस आरोपीच्या शोधात भाजप कार्यालयात गेली. पोलीस भाजप कार्यालयात आल्याने दानवेंचा राग अनावर झाला आणि पोलिसांनी बेकायदेशीर कृत्य करत कार्यालयातील संचिका तसेच विकास कामांचा डेटा सोबत घेऊन गेल्याची गंभीर तक्रार त्यांनी पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांच्याकडे केली. त्यानंतर अधीक्षक विनायक देशमुख यांनी २ पीएसआयसह ५ पोलीस कर्मचार्यांना निलंबित केलं होत.
पोलिसांवर केलेल्या कारवाईला राजकीय वळण लागले. आणि पोलिसांच्या निलंबनावर आक्षेप घेत पोलीस अधीक्षक यांनी केलेल्या कारवाईवरती टीका केली गेली. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अर्जुन खोतकरांनी भर घातली. आणि त्यांनी थेट गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांकडे दानवेंच्या तक्रारीवरून केलेलं निलंबन कसे चुकीचे आहे आणि हे निलंबन मागे घेण्याची विनंती केली. आणि यावरून रावसाहेब दानवे विरुद्ध अर्जुन खोतकर यांचा वाद पुन्हा उफाळून आला असल्याची चर्चा सुरु झाली.
दानवे यांची केंद्रीय मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी:
रावसाहेब दानवे हे आपल्या पदाचा दुरुपयोग करत असून त्यांना वाळू माफियांचा एवढा पुळका का? असा सवाल करत खोतकरांनी दानवे यांची केंद्रीय मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.
News Title: Central minister Ravasaheb Danve and Shivsena leader Arjun Khotkar political war news updates.
