हिंगणघाट, २१ जून | शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या लेटर बाँम्बमुळे पुन्हा एकदा राज्यात शिवसेना आणि भाजपा युती होणार का याची चर्चा सुरू झालीय. शिवसेनेनं मात्र पक्ष बळकट करण्यासाठी मोर्चे बांधणी सुरूच ठेवलीय. आज भाजपच्या बालेकिल्ल्यातील नगरसेवक फोडून शिवसेनेनं भाजपला उघड आव्हानच दिलंय. गेली काही वर्षे सातत्याने विदर्भ भाजपचा बालेकिल्ला म्हणून पुढे आला आहे. आज याच विदर्भातील हिंगणघाट नगरपालिकेतील उपाध्यक्ष चंद्रकांत घुसे यांच्यासह भाजपचे विद्यमान 10 नगरसेवक आणि 2 माजी नगरसेवक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्ष प्रवेश करत आहेत. हिंगणघाट नगरपालिकेवर सध्या भाजपचीच सत्ता आहे. असं असतानाही भाजपचे 10 विद्यमान नगरसेवक शिवसेनेत पक्ष प्रवेश करत आहेत.

त्यामुळे विदर्भात भाजपला सर्वात मोठं भगदाड पडल्याचं चित्र आहे. निवडणुकीपूर्वी हिंगणघाट नगरपरिषदेतील भाजपचे आठ ते नऊ नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर येऊन ते शिवबंधन बांधत आहेत. भाजपचे स्थानिक आमदार समीर कुणावर यांच्या कामाला कंटाळून शिवसेना प्रवेश करत असल्याचं सांगण्यात येत आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की पोहचावा.

News Title: Hinganghat BJP corporators will join Shivsena party in presence of CM Uddhav Thackeray news updates.

भाजपाला मोठं खिंडार | तब्बल १० विद्यमान नगरसेवक आणि २ माजी नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार