30 April 2025 10:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस, 1 शेअरवर 4 फ्री शेअर्स देणार ही कंपनी, सुवर्ण संधी सोडू नका SBI Mutual Fund | श्रीमंत करणारी SBI फंडाची योजना, महिना 5,000 रुपये SIP वर मिळेल 2 कोटी 56 लाख रुपये परतावा 8th Pay Commission | तुमच्या कुटुंबात सरकारी आहेत का? फिटमेंट फॅक्टर + DA मर्जर; पगारात किती वाढ होईल पहा Home Loan EMI | ईएमआय वर 77 लाखांचं घर घ्यावं की SIP करावी? तुमचा अधिक फायदा कुठे आहे समजून घ्या EPFO Pension Money | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांनो, अन्यथा तुम्हालाही महिना कमी पेन्शन घ्यावी लागेल, ही अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 30 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी अलर्ट; डाऊनसाइड टार्गेट प्राईस अलर्ट, स्टॉक BUY, Sell की Hold करावा? - NSE: IRB
x

प्रचार तंत्र | मोदींना धन्यवाद देणारे बॅनर लावण्याचे शैक्षणिक संस्थांना आदेश | नेहरूंनी ते कधीच केलं नाही

UGC banners of thanking PM

नवी दिल्ली, २२ जून | यूनिव्हर्सिटी ग्रांट्स कमीशन (UGC) ने सर्व विद्यापीठ, कॉलेज आणि टेक्निकल इंस्टीट्यूट्सना मोफत लसीकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना धन्यवाद देणारे बॅनर लावण्याचे आदेश दिले आहेत. सूत्रांनी सोमवारी दावा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 18 याच महिन्यात 18+ वयोगटासाठी मोफत लसीकरणाची घोषणा केली होती. सोमवारी याची सुरुवात झाली. रविवारी विविध यूनिव्हर्सिटीजच्या अधिकाऱ्यांना पाठवलेल्या एका व्हॉट्सअॅप मेजेसमध्ये UGC सेक्रेटरी रजनीश जैनने संस्थांच्या सोशल मीडिया पेजवर धन्यवादचे बॅनर शेअर करण्यास सांगितले आहे.

रजनीश जैनच्या कथित मेसेजमध्ये म्हटले आहे की, भारत सरकार 21 जून, 2021 पासून 18 + वयोगटाचे मोफल लसीकरण सुरू करत आहे. याबाबत विद्यापीठ आणि कॉलेजने आपल्या सोशल मीडियावर बॅनर शेअर करावे. सूचना आणि प्रसारण मंत्रालयाकडून उपलब्ध केलेले होर्डिंग्स आणि बॅनरचे डिझाइन हिंदी आणि इंग्रजीमध्ये रेफरेंससाठी अठॅच आहेत. पोस्टरवर नरेंद्र मोदींचा फोटो आहे. त्यावर थँक यू PM मोदी लिहीले आहे. याबाबत विचारण्यासाठी जैन यांना फोन केला असता, त्यांनी उत्तर दिले नाही. पण, तीन विद्यापीठांच्या अधिकाऱ्यांनी या मेसेजची पुष्टी केली आहे.

अनेक विद्यापीठांनी बॅनर शेअर केले
दिल्ली यूनिव्हर्सिटी, हैदराबाद यूनिव्हर्सिटी, भोपाळमध्ये LNCT यूनिव्हर्सिटी, बेनेट यूनिव्हर्सिटी, गुडगावमधील नॉर्थकॅप यूनिव्हर्सिटी यांनी आपल्या सोशल मीडियावर हॅशटॅगसह ThankyouModiji लिहून बॅनर शेअर केले आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की पोहचावा.

News Title: UGC asked educational institutions to put up banners thanking Prime minister for free vaccination news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Education(85)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या