29 April 2024 4:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार? IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, अशी संधी सोडू नका Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या Jai Balaji Share Price | कुबेर कृपा करतोय हा शेअर! वेळीच खरेदी करा, मागील 1 वर्षात दिला 1700 टक्के परतावा
x

शेतकऱ्यांसाठी नैसर्गिक कीटकनाशक | असे तयार करा - वाचा सविस्तर

Natural tonic for crop

मुंबई, २२ जून | सेंद्रिय शेती म्हणजे परंपरागत शेती होय. शेती करताना रसायनाचा वापर न करता केवळ शेतातील पिकांचे अवशेष, शेण, गोमूत्र व नैसर्गिक साधनांचा वापर करून सेंद्रिय शेती केली जाते. हरितक्रांतीच्या अगोदर शेतामध्ये केवळ शेणखत वापरत असत. बियाणे सरळवाण म्हणजेच कोणत्याही प्रकारची प्रकिया न केलेले वापरत. यामुळे पिकांची गुणवत्ता वाढत असे. जमिनीमध्ये कर्ब योग्य प्रमाणात राहिल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढून पिकाची वाढ योग्य होऊन उच्च प्रतीच्या व आरोग्यास पोषक असण्याऱ्या उत्पादनाची निर्मिती होत होती.

रासायनीक शेती ही उत्पादनखर्च वाढवणारी आहे व मानवी आरोग्य व प्राण्यांचे आरोग्यास हानिकारक आहे त्याच बरोबर मातीचे ही उत्पादनक्षमता कमी होते त्यामुळे आता आपल्याला नैसर्गिक कीटकनाशके व नैसर्गिक टॉनिक वापरावे लागेल. त्यामध्ये जिवाणू पाणी गारबेज, सेंद्रिय युरिया, संजीवनी अर्क, ह्युमिक ऍसिड अशा प्रकारचे टॉनिक व कीटकनाशके वापरायचे आहे.

जिवाणूपाणी / कल्चर:
एकरी पाणी १८० लीटर + देशी गायीचे शेण ५ किलो + देशी गायीचे गोमुत्र ५ लिटर + गुळ २ किलो + राख ( अग्निहोत्राची असेल तर सर्वोत्तम ) २ किलो + माती ( रस्त्याकडचा फुफूटा) २ किलो हे सर्व मिश्रण एकत्र करून ७ दिवस ठेवणे .७ ते २१ दिवसापर्यंत वापरता येते

गारबेज:
(९० दिवसाचा फॉर्मूला ) गोड फळे १० किलो+ गुळ ३.५ किलो + पाणी ३५ लिटर हे सर्व मिश्रण एकत्र करून बॅरल मध्ये पॅक करून ठेवणे. पहिले ३० दिवस दररोज एकवेळ त्यामधील गॅस काढणे. दुसऱ्या ३० दिवसापर्यंत ४ दिवसातुन एक वेळ गॅस काढणे. शेवटच्या ३० दिवसात ८ दिवसातुन एकदा गॅस काढणे. प्रमाण फवारणी करीता १ लीटर पाण्यास १ मिली गारबेझ. आळवणी करीता १ लीटर पाण्यास ५ मिली गारबेझ.

सेंद्रीय युरीया:
एकरी २ किलो कॉंग्रेस गवत + १०० ग्रँम ईष्ट पावडर किंवा २ लिटर D कंपोजर + देशी गायीचं गोमूत्र ४ लिटर + पाणी १० लिटर हे सर्व मिश्रण एकत्र करून २० दिवस ठेवावे दररोज सकाळ संध्याकाळ काडीने ढवळावे. २० दिवसानंतर तयार होते.

गारबेज:
(१५ दिवसाचा फॉर्मूला) यामध्ये वरील सर्व निविष्ठासोबत ईष्ट पावडर १०० ते १५० ग्रँम वापरावी. पाण्याऐवजी D कंपोजर वापरू शकता.

संजीवनी अर्क:
देशी गायीचे गोमूत्र ५ लीटर + मैदा १ किलो + तांदळाचे पिठ १ किलो + गुळ १ किलो हे मिश्रण एकत्र करून ८ दिवस ठेवावे. ८ दिवसानंतर त्या मधील १ लिटर विरजण घ्यावे व त्यात ४ लिटर देशी गायीचे गोमूत्र व २५० ग्रॅम गुळ टाकून परत ८ दिवस ठेवून नंतर वापरावयास घ्यावे.

प्रमाण:
प्रति पंप ८० ते १५० मिली आळवणी एकरी ५ लिटर. अग्निहोत्राची राख १०० ग्रॅम १ लीटर देशी गायीच्या गोमुत्रामध्ये १२ ते २४ तास भिजत ठेवुन त्यानंतर १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पिकाच्या फूलकळी अवस्थेमध्ये गोमूत्राऐेवजी ताक वापरावे. याचे अद्भुत परीणाम मिळतात.

ह्यूमिक अॅसीड:
एकरी देशी गायीच्या २० लिटर गोमुत्रामध्ये ५ लिटर ताक टाकावे या मिश्रणामध्ये तिसऱ्या दिवशी २०० ते ३०० ग्रॅम गुळ टाकून ७ दिवसाच्या आत वापरावे. जनावराची वार( देशी गायीची सर्वोत्तम ) एका ड्ममध्ये २० लीटर पाणी + २ लीटर D कंपोजर + २० लीटर देशी गायीच गोमुत्र हे सर्व एकत्र वारेचे पाणी होईपर्यंत ठेवणे.

प्रमाण:
फवारणीसाठी प्रती पंप २०० मिली आळवणी एकरी ३ते ४ लिटर

करपा:
एकरी १०० ग्रॅम बाभळीचा पाला २ लीटर पाण्यात टाकून १ लिटर होईपर्यंत शिजवावे गार झाल्यानंतर त्यामध्ये देशी गायीचे गोमूत्र १ लीटर टाकून फवारणी करावी . ६४ प्रकारच्या किडींवरती एकच औषध – २ किलो काँग्रेस गवत १० लीटर पाण्यात टाकून २.५ लीटर होईपर्यंत शिजवावे .

प्रमाण प्रती पंप १५ ते २० मिली खतरनाक रिझल्ट:

फुलकळी वाढवण्यासाठी:
हुंबूराची फळे १ किलो व १ किलो गुळ दहा दिवस एकत्र करून कुजवणे

प्रमाण:
फवारणी साठी प्रती पंप ५० मिली:

फळगळ:
एकरी पळसाची फुले २ किलो + देशी गायीचे गोमुत्र २ लीटर + पाणी २ लीटर हे सर्व मिश्रण एकत्र करून ७ दिवस ठेवणे. त्यानंतर वापरावयास चालते. कॅल्शीयम व बोरॉनची कमतरता पूर्ण करते.

रोगप्रतीकारक शक्ती वाढवण्याकरीता:
एकरी १०० ग्रॅम बेलाची पाने २ लिटर पाण्यामध्ये टाकून १ लिटर होईपर्यंत आटवावे तयार झालेल्या द्रावणाची फवारणी करावी.

खोड किड किंवा शेंडा मुरगळणे:
३ फड्याची (घायपात )पाने घेउन छोटे छोटे तुकडे करून २ लिटर पाण्यात ३६ तास भिजत ठेवावे ३६ तासानंतर फवारणीसाठी प्रमाण प्रती पंपास १ ते अर्धा लिटर

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: Natural home made tonic for crop news updates.

हॅशटॅग्स

#Farmer(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x