29 April 2024 2:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या Jai Balaji Share Price | कुबेर कृपा करतोय हा शेअर! वेळीच खरेदी करा, मागील 1 वर्षात दिला 1700 टक्के परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, स्टॉक तेजीत येतोय, टार्गेट प्राईस जाणून घ्या Penny Stocks | एक वडापावच्या किमतीत 16 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत करतील श्रीमंत PSU Stocks | हा PSU शेअर बंपर तेजीत वाढणार, 2 महिन्यात होईल मोठी कमाई, काय म्हटलं तज्ज्ञांनी? IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर्स 30 दिवसात मोठी परतावा देणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर IREDA Share Price | IREDA शेअर्स खरेदीसाठी गुंतवणूकदार तुटून पडले, कंपनीबाबत लेटेस्ट अपडेट, फायदा घेणार?
x

कडवी झुंज; परंतु पी व्ही सिंधूला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले

चीन : चीनमध्ये सुरु असलेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूला स्पेनच्या कॅरोलिना मरीन हिने २१-१९, २१-१० असे पराभूत केले आहे. त्याआधी स्पेनच्या कॅरोलिना मरीन हिनेच भारताच्याच सायना नेहवाल हिला पराभूत केले होते. परंतु पी व्ही सिंधूने सुद्धा कडवी झुंज दिली होती.

पी व्ही सिंधूने सुरुवातीला घेतलेली आघाडी फलदायी ठरू शकली नाही. त्यानंतर कॅरोलिना मरीनने दमदार खेळी करत पहिला गेम २१-१९ असा जिंकला. त्यानंतर दुसऱ्या गेममध्ये सिंधूला मात दिली, जो कॅरोलिना मरीनने तब्बल अकरा गुणांच्या फरकाने जिंकला. त्यामुळे अखेर पी व्ही सिंधूचे विजेतेपदाची स्वप्न भंगले आहे आणि तिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

त्याआधी झालेल्या थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत सुद्धा भारताच्या पी. व्ही. सिंधूला पराभवाला सामोरे जावे लागले होते. जपानच्या नोझुमी ओकुहाराने सिंधूचा २१-१५, २१-१८ असा सरळ गेममध्ये पराभव केला होता. त्या पराभवाचा वचपा सिंधूने या स्पर्धेत काढला होता.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x