19 May 2024 10:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

कुणी काहीही मागणी केल्यावर सीबीआय चौकशी होत नसते, त्याला राज्य सरकारची परवानगी लागेल - गृहमंत्री

Home minister Dilip Walse Patil

मुंबई, २५ जून | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरावर ईडी अर्थात अंमलबजावणी संचलनालयाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी धाड टाकली. तत्पूर्वी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत अजित पवारांच्या विरोधात सीबीआय चौकशीची मागणी करणारा ठराव मांडण्यात आला. या संपूर्ण प्रकणावर आता राज्याचे विद्यमान गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया जारी केली. कुणीही काहीही मागणी केल्याने सीबीआय चौकशी होत नसते असे गृहमंत्री म्हणाले आहेत.

भारतीय जनता पक्षाच्या मागणीवर गृहमंत्री पाटील यांनी संताप व्यक्त केला. गृहमंत्री म्हणाले, “चुकीच्या वेळी चुकीच्या गोष्टी केल्या जात आहेत. प्रत्यक्षात कोरोनाची परिस्थिती असताना सर्वांचे लक्ष त्यावर असायला हवे. तपासाबद्दल बोलायचे झाल्यास मी याबाबत जास्त बोलू इच्छित नाही. संबंधित तपास यंत्रणा आपले काम करत आहेत. पण, यात कुणी काहीही मागणी केली तरी सीबीआय चौकशी होत नसते. यासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागेल.”

भारतीय जनता पक्षाने मांडला सीबीआय चौकशीचा ठराव:
अनिल देशमुख, संजय राठोड यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर भाजपने आपला मोर्चा थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वळवला असून परमबीर प्रकरणात अजित पवार आणि परिवहनमंत्री अनिल परब यांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. भारतीय जनता पक्ष प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत गुरुवारी तसा ठराव करण्यात आल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे पुढील लक्ष्य हे अजित पवार असतील याचे संकेत मिळाले आहेत. कार्यकारिणीच्या बैठकीत ओबीसींच्या राजकीय आरक्षणप्रश्नी राज्यभर आंदोलन छेडण्याचाही निर्णय घेण्यात आला.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: Home minister Dilip Walse Patil replay to BJP over statement against DCM Ajit Pawar under CBI investigation news updates.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x