17 May 2024 12:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | टेन्शन वाढलं! आज सोन्याचा भाव अजून महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या My EPF Money | पगारदारांनो! तुमच्या खात्यातही पैसे जमा झाले असतील तर पटापट तपासून घ्या, नियम बदलला Shukra Rashi Parivartan | 'या' 3 नशीबवान राशीत तुमची राशी आहे का? शुक्र राशी परिवर्तन ठरणार अत्यंत भाग्यशाली SBI Mutual Fund | पगारदारांनो! या खास योजना तुम्हाला अल्पावधीत 22 लाख रुपयेपर्यंत परतावा देतील, यादी सेव्ह करा Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा
x

प्रॉपर्टीचा ताबा मिळण्यास उशीर झाल्यास खरेदीदारांसाठी कायदेशीर उपाय - नक्की वाचा

Property possession delayed

मुंबई, २७ जून | एक प्रॉपर्टी खरेदीदार, आपल्या कष्टाच्या पैशाने घर खरेदी करण्यासाठी गुंतवणूक करतो आणि ज्यावेळी त्याला वेळेवर ताबा मिळत नाही, त्यावेळी त्याला त्याचे हक्काचे छप्पर मिळत तर नाहीच वरुन त्याचा पैसाही तो गमावून बसतो. गृहकर्जाचे हप्ते (EMI) आणि भाड्याने घेतलेल्या घरसाठीचे भाडे भरण्याशिवाय त्याच्यासमोर पर्याय राहत नाही. शिवाय खरेदीदारला न्याय मिळण्यासाठी दीर्घ आणि कठोर कायदेशीर लढाईही लढावी लागते.

कायदेशीर उपाय:
जर ताबा वेळेवर मिळाला नाही, तर ग्राहक बिल्डरला नोटिस पाठवून व्याज आणि / किंवा झालेल्या नुकसानासह भरलेल्या रकमेचा परतावा मिळण्यासाठी दावा करू शकतो. बिल्डरच्या विरोधात ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 अंतर्गत परिभाषित केल्याप्रमाणे ग्राहक “सेवेत कमतरता(डेफिसिएंशी इन सर्व्हिस)” ही तक्रारदेखील दाखल करू शकतो. असे या क्षेत्रातील तज्ज्ञ सुचवतात.

फ्लॅट खरेदीदाराने प्रॉपर्टीच्या मूल्य किंवा त्याला झालेल्या नुकसानाची रक्कम याची नोंद कायद्याच्या अंतर्गत योग्य ग्राहक वाद निवारण मंचाकडे स्थापित करण्याआधी लेखी तक्रारी दाखल करणे आवश्यक आहे. 20 लाखांपेक्षा अधिक रकमेचे विवाद राज्य आयोगाकडे थेट दाखल केला जाऊ शकतो आणि एक कोटी रुपयांपेक्षा जास्त विवाद नवी दिल्ली येथे राष्ट्रीय आयोगापुढे सादर केला जाऊ शकतो. 20 लाख रुपयांपेक्षा कमी मूल्याचे कोणतेही विवाद जिल्हा आयोगामध्ये दाखल करावेत”, असे तज्ज्ञ सांगतात.

नॅशनल कंझ्युमर डिस्प्यूट रिड्रेसल कमिशनने अलीकडेच युनिटेकला ताबा देण्यास विलंब केल्यासाठी 3 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. आणखी एका प्रकरणात, ग्रेटर नोएडामध्ये, 300 पेक्षा जास्त खरेदीदारांनी एका बिल्डरने ताबा देण्यास विलंब केल्याने त्याच्या विरोधात निषेध नोंदवला. काही महिन्यांपूर्वी, मुंबईतील एका डेव्हलपरने ताबा देण्यास विलंब केल्याबद्दल खरेदीदारांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले होता.

तज्ञांनी असे म्हटलेले होते की एखादा खरेदीदार भारतीय कॉन्ट्रॅक्ट अॅक्ट 1872 नुसार सक्षम अधिकाऱ्याच्या कोर्टात नुकसान भरपाईसाठी किंवा कामात कुचराई केल्याबद्दल खटला दाखल करू शकतो. यात फसवणूक समाविष्ट असेल – उदाहरणार्थ, बिल्डरला सुरुवातीपासून माहीत असेल की तो सांगत असलेल्या वेळेत ताब्यात देऊ शकणार नाही पण काही चुकीचे प्रस्तुतीकरण करून, खरेदीदारला फ्लॅट बुक करण्यासाठी प्रेरित केले – अश्या वेळेस नागरी(सिव्हिल) आणि फौजदारी(क्रिमिनल) कारवाई सुरू केली जाऊ शकते.

होणारे नुकसान आणि तक्रारदाराला कायदेशीर मार्गाने मिळवू शकणारे साहाय्य:
हरीयानी यांच्या मते ग्राहक खरेदीदार / तक्रारदार खालील साहाय्य मिळवू शकतात

* आपल्या संबंधित क्षेत्रातील चालू बाजार भावानुसार वैकल्पिक घर खरेदी करण्यासाठी आवश्यक असलेल्या पैश्यांसाठी दावा करु शकतात. खरेदीदार बिल्डरला देण्यात आलेले पैसेही परत मागू शकतात.

* त्या तारखेपर्यंत दिलेल्या रक्कमेवर व्याजाचा दावा करू शकतात.

* खरेदीदार / तक्रारकर्ते वैयक्तिक वापरासाठी प्रॉपर्टीची खरेदी करीत असल्यास राष्ट्रीय ग्राहक संरक्षण आयोगा मध्ये मदतीसाठी तक्रार दाखल करू शकतात.

* जर खरेदीदार / तक्रारदार यांना काही महिन्यांत किंवा वर्षांमध्ये फ्लॅटचा ताबा मिळेल याची खात्री असेल , तर ते पर्यायी निवासस्थानाच्या भाड्यासाठी दावा करू शकतात. हा नियम जर खरेदीदाराचे ते पहिलेच घर असेल किंवा त्याच्या इमारत पुनर्विकसित होत असेल तरच लागू होतो.

* खरेदीदार दुसरीकडे ते पैसे न गुंतवु शकल्याबद्दल नुकसानभरपाईचा दावा करू शकतो
कोणत्याही करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी खरेदीदारांनी अस्वीकृत मुद्द्यांसह सर्व मुद्दे वाचले पाहिजे, आणि बिल्डरची आर्थिक विश्वासार्हता तपासून घ्यायला हवी.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: Property possession delayed here is what you can do article news updates.

हॅशटॅग्स

#RealEstate(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x