2 May 2024 4:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

मुंबईचे मेजर कौस्तुभ प्रकाश राणे यांना दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण

मुंबई : उत्तर काश्मीरच्या गुरेज सेक्टरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्नं करणाऱ्या दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराच्या ४ जवानांना वीरमरण आले आहे. शहिद झालेल्या जवानांमध्ये मुंबईचे सुपुत्र मेजर कौस्तुभ प्रकाश राणे शहीद झाले आहेत. वयाच्या अवघ्या २९व्या वर्षी त्यांना वीरमरण आल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे.

शहिद झालेल्या जवानांमध्ये मनदीप सिंग रावत, हमीर सिंग, विक्रम जीत सिंग यांचा सुद्धा समावेश आहे. या चकमकीत २ दहशतवाद्यांचा सुद्धा खात्मा करण्यात आला आहे. शहीद मेजर कौस्तुभ प्रकाश राणे हे मीरा रोड येथील रहिवासी होते. शीतल नगर भागात असलेल्या हिरल सागर मध्ये त्यांचं कुटुंब वास्तव्यास आहे.

चकमकीनंतर लष्कराने घटनास्थळावरून २ दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात घेतले आहेत. परंतु लष्कराकडून अजून शोधकार्य सुरू आहे.

हॅशटॅग्स

#Indian Army(52)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x