19 May 2024 12:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Pension Money | नोकरदारांनो! आजच 'अर्ली पेन्शन' साठी ऑनलाईन अर्ज करा, अकाउंटमध्ये पैसे जमा होतील Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! या फंडात SIP बचत करा, अवघ्या 5 वर्षात मिळेल 50 लाख रुपये परतावा Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला
x

विधिमंडळ पावसाळी अधिवेशन | शिवसेनेकडून सर्व आमदारांना व्हिप जारी

Shivsena

मुंबई, २९ जून | महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ५ आणि ६ जुलैला होत आहे. या अधिवेशनात संपूर्ण दिवस उपस्थित राहायच आहे. अधिवेशनात पुरवणी मागण्या शासकीय कामकाज आणि पुरवणी विनियोजन विधेयके यावर चर्चा मतदान करून मंजूर करण्यात येणार आहे. त्यामुळे शिवसेनेच्या सर्व आमदारांनी संपूर्ण अधिवेशन पूर्ण दिवस उपस्थित राहिले पाहिजे, असा पक्षादेश व्हीप शिवसेनेचे प्रतोद आमदार सुनील प्रभू यांनी शिवसेना विधिमंडळ पक्षनेते कार्यालयाद्वारे शिवसेनेच्या आमदारांना जारी केला आहे.

विशेष म्हणजे विधिमंडळाच्या नियमित कामकाजासोबत या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षाची निवड होण्याची शक्यता असल्यानं सेनेच्या या व्हिपला महत्व प्राप्त झालं आहे. मराठा आरक्षण, ओबीसींचं स्थानिक स्वराज संस्थांमधील रद्द झालेलं अतिरिक्त आरक्षण, कोरोना रुग्णसंख्या, कोरोना लसीकरण, अनिल देशमुख प्रकरण, शेतकऱ्यांचे प्रश्न, दुधाचे घटलेलं दर यामुळे विरोधी पक्ष भारतीय जनता पक्ष सभागृहात आक्रमक होण्याची शक्यता असल्यानं शिवसेनेनं देखील दक्षता म्हणून त्यांच्या आमदारांना व्हीप बजावला असल्याचं कळतंय.

दरम्यान, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ईडी चौकशीच्या (ED) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर राष्ट्रवादीचे दिग्गज मंत्री वर्षा बंगल्यावर दाखल झाले. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे शरद पवारांच्या जवळचे मंत्री वर्षा बंगल्यावर पोहोचले. मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे हे सुद्धा वर्षावर उपस्थित होते. इथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत महत्त्वाची बैठक झाली. त्याचदरम्यान राष्ट्रवादीचे दिग्गज नेते वर्षा बंगल्यावर दाखल झाल्यानंतर तासाभराने म्हणजे संध्याकाळी 4 च्या सुमारास स्वत: शरद पवारही वर्षा बंगल्यावर दाखल झाले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: Shivsena issue whip to all Shivsena MLAs before state monsoon Assembly Session news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x