5 May 2024 10:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

केरळला तुफान पावसाने झोडपलं, आतापर्यंत २९ जणांचा मृत्यू: ANI

केरळ : केरळमध्ये कालपासून पावसाने थैमान घातले असून त्यात जवळपास २९ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तुफान बरसणाऱ्या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. जोरदार बरसणाऱ्या पावसामुळे इडुक्की धरण पूर्ण भरले असून आता पाणी ओसंडून वाहू लागल्याने धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले आहेत.

केरळच्या इतिहासात पहिल्यांदाच पावसामुळे अशी परिस्थिती उद्भवली असल्याचं म्हटलं जात आहे. या अतिवृष्टीमुळे जवळपास ५४००० लोकं बेघर झाल्याचं केरळ सरकारने म्हटलं आहे. तुफान पावसाचा फटका जवळपास ६ जिल्ह्यांना बसल्याच वृत्त आहे. सरकाकडून सर्व मदत कार्य सुरु असून अनेक ठिकाणी पावसामुळे मदतकार्यात सुद्धा अडथळे येत आहेत.

अनेक ठिकाणी सुरक्षेच्या करणामुळे शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्यात आली असून लोकांनी महत्वाच्या कामा शिवाय घराबाहेर पडू नये असं सरकाकडून कळविण्यात येत आहे. मदत कार्यात तब्बल १०,४०० लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x