15 May 2024 12:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEML Share Price | सरकारी कंपनीचा स्टॉक रॉकेट तेजीत, 2 दिवसात 18% परतावा दिला, खरेदीला ऑनलाईन गर्दी LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | NMDC सहित हे 5 शेअर्स मोठा परतावा देणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देतील, अल्पावधीत कमाईची मोठी संधी Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Polycab Share Price | तज्ज्ञांकडून पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर 'बाय' रेटिंग, 953% परतावा देणारा शेअर तेजीत वाढणार
x

मी कुठेही गायब झालो नव्हतो | मी काही मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी नाही - आ. प्रताप सरनाईक

Shivsena MLA Pratap Sarnaik

मुंबई, ०५ जुलै | शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी पुन्हा एकदा आघाडी सरकारविरोधातील खदखद बोलून दाखवली आहे. जेव्हा माझ्यावर संकट आलं तेव्हा महाविकास आघाडीचे नेते माझ्या आणि माझ्या कुटुंबीयांच्या पाठी उभे राहिले नाहीत. त्यामुळेच मी मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहिलं, असं सांगून प्रताप सरनाईक यांनी खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे सरनाईक हे आघाडी सरकारवर नाराज असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.

दरम्यान, या काळात प्रताप सरनाईक गायब झाल्याचे बोलले जात होते. लोणावळ्यात ईडीने छापेदेखील टाकले होते. यावर बोलताना सरनाईक यांनी सांगितले की, माझ्या हृदयावर शस्त्रक्रिया, पत्नीचा कॅन्सर, कुटुंबावर कोरोनाचा घाला अशी संकटे आली होती. मी कुठेही गायब झालो नव्हतो. परिस्थिती पाहता मी काही दिवस शांत राहण्याचा निर्णय घेतला होता. मी काही विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी नाही, ईडीने कारवाई केली म्हणून गायब होणार, बाहेर जाणार, पळून जाणार, असे ते म्हणाले.

या देशामध्ये माझ्यावर कुठेही एफआयआर नाही, माझ्या विरोधात कोणी वक्तव्य दिलेले नाही. माझ्यावरील आरोपांना सर्वोच्च न्यायालयाने संरक्षण दिले आहे. त्यामुळे मी कुठे गायब झालेलो नाही, असे सांगतानाच शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांनी आज विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला हजेरी लावली.

या देशात किंवा कुठेही माझ्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल नाही किंवा तक्रार नाही. कोणीही माझ्याविरोधात जबाब दिलेला नाही. सर्वोच्च न्यायालयानं संरक्षण दिलं आहे. ईडीच्या कारवाईमुळे मी गायब झालो असं नाही. माझ्यावर झालेली ह्रदयरोगाची शस्रक्रिया. पत्नी कर्करोगाशी झुंज व घरात करोनाशी लढा या सगळ्यात मी अडकलो होतो. यामुळे मी शांत बसण्याचा निर्णय घेतला होता,” असं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Shivsena MLA Pratap Sarnaik expressed displeasure to MahaVikasAghadi leaders over ED enquiry news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x