29 April 2024 10:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | स्मार्ट इन्व्हेस्टमेंट! दर महिन्याला 5-10-15 हजार रुपये गुंतवून तुम्ही 1 कोटी रुपये मिळवू शकता HDFC Mutual Fund | सुवर्ण संधी! HDFC म्युच्युअल फंडाची नवी योजना लाँच, 100 रुपयांपासून करा गुंतवणूक Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय
x

Health First | तांब्याच्या भांड्यातून चूकूनही खाऊ नका हे 5 पदार्थ | वाचा होणारं नुकसान

Avoid eating in cooper pots in Marathi

मुंबई, ०५ जुलै | तांब्याच्या भांड्यात ठेवललं पाणी पिण्याचे फायदे तर सर्वांनाच माहित असेल. तांब या धातूचे अनेक फायदे आपल्याला माहीतच असतील. पण तुम्हाला हे माहित आहे का, की काही असे पदार्थही आहे जे तांब्याच्या भांड्यात अन्न घेऊन खाल्लं तर आपल्याला विषबाधा होऊ शकते. खरं तर ही भांडी तांब या धातूची असल्याने हे ठराविक अन्न पदार्थांबरोबर मिसळून रिएक्ट होऊन विषबाधा(फूड प्वाइजनिंग) होण्याची शक्यता असते. तर चला पाहुयात असे कोणते पदार्थ आहेत ज्याचा सेवन आपण तांब्याच्या भांड्यात ठेवला असेल तर करू नये.

दूध:
चुकूनही तांब्याच्या भांड्यात दूध कधी ठेऊ नये. तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं दूध हे विषारी बनते. जर तुम्ही हे दूध पिलं तर तुम्हाला अन्न विषबाधा (फूड प्वाइजनिंग) होण्याची दाट शक्यता असते.

दही:
दही शरीरासाठी एक उत्तम पदार्थ म्हणून ओळखला जातो. पण हेच दही जर तांब्याच्या भांड्यात ठेवलं असेल तर तं विषारी बनतं. तांब्याच्या भांड्यात असणारे घटक आणि दह्यात असणारे घटक यांच्यात रासायनिक प्रक्रिया होते. आणि जर हे दही आपण खाल्लं तर अन्न विषबाधा (फूड प्वाइजनिंग) होण्याची शक्यता असते.

लोणचे:
लोणचं चुकूनही तांब्याच्या भांड्यात ठेऊ नये. लोणच्यात सिरकाचा प्रमाण असतो आणि हे तांब्याच्या भांड्यातील मेटल सोबत मिसळतं. म्हणून या भांड्यात ठेवलेलं लोणचं आरोग्यास हानिकारक असतं.

४. साइट्रस फळ (आंबट फळ):
तांब्याच्या भांड्यात आंबट फळे ठेऊ नये आणि त्याचे सेवनही करू नये. यामुळे तुमचं पोट तर बिघडतंच पण त्याच सोबत उल्टी, चक्कर येण्यासारखे प्रकारही होऊ शकतात.

५. लिंबूचा रस:
लिंबूचा रस तांब्याच्या भांड्यात ठेवल्याने त्यातील ऍसिडची तांब्याच्या भांड्यासोबत रासायनिक प्रक्रिया होते. अशा लिंबाच्या रसाचं सेवन केल्यास पोट दुखणे आणि ऑसिडिटी सारखे प्रकार उदभवू शकतात.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Avoid eating these things in cooper pots in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x