25 September 2022 3:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
राज्यातील तरुणांचा रोजगाराचा मुद्दा गंभीर होऊ लागताच शिंदे गटाकडून धामिर्क मुद्द्यांवर भर, 'हिंदू गर्व गर्जना' यात्रा रोजगार निर्माण करणार? Ankita Bhandari Murder | अंकिता भंडारी मर्डर केस, भाजप नेत्याचा मुलगा मुख्य आरोपी, भाजप नेत्याच्या रिसॉर्टला लोकांनी आग लावली शिंदेंच्या राजवटीत चाललंय काय?, राज्यातून रोजगारही जातोय, तिकडे मुस्लिम समाजाच्या विकासासाठी निधी, इकडे पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा PPF Investment | लोकप्रिय असणारी हि सरकारी योजना सुद्धा करोडमध्ये परतावा देते, परताव्याची हमी देणाऱ्या योजनेचे गणित जाणून घ्या शिवसेनकडून भाजपाला धक्के, भाजपचे 12 नगरसेवक संपर्कात, माजी नगरसेविका ज्योत्सना दिघें कार्यकर्त्यासहित शिवसेनेत Horoscope Today | 25 सप्टेंबर 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Numerology Horoscope | 25 सप्टेंबर, रविवारसाठी तुमचा लकी नंबर आणि काय सांगतं तुमचं अंकज्योतिष शास्त्र
x

केंद्राने OBC एम्पिरिकल डेटा द्यावा | सुप्रिया सुळेंची संसदेत मागणी | भाजप नेत्यानं म्हटलं टाईमपास...

OBC Reservation

नवी दिल्ली, १० ऑगस्ट | दिल्लीत सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. सध्या संसदेत आरक्षण आणि घटनादुरुस्तीवरून दावे प्रतिदावे सुरु झाले आहेत. त्यालाच अनुसरून राज्यातील मराठा आरक्षण आणि ओबीसी राजकीय आरक्षणावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करताना दिसत आहेत.

दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या राज्य सरकार व केंद्र सरकारमध्ये टोलवाटोलवी सुरू आहे. केंद्र सरकारने एम्पिरिकल डेटा द्यावा, असे राज्य सरकारचे म्हणणे आहे. हीच मागणी सुप्रिया सुळे यांनी संसदेत केली. यावरून भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेमध्ये ३७७ अंतर्गत एम्पिरिकल डेटा (OBC) केंद्र सरकारने द्यावा ही मागणी केली. ३७७ अंतर्गत केंद्र सरकार किंवा कुठल्याही खात्याचा मंत्री सभागृहात उत्तर देण्याची तरतूद नाही मग ह्या आयुदा अंतर्गत हा महत्त्वाचा प्रश्न विचारून काय होणार आहे? हा टाईमपास कशाला?, अशी विचारणा निलेश राणे यांनी केली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: BJP leader Nilesh Rane target NCP MP Supriya Sule over OBC empirical data demand with Modi govt news updates.

हॅशटॅग्स

#SupriyaSule(32)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x