7 May 2024 3:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Anup Engineering Share Price | दणादण परतावा देणारा शेअर! 1 दिवसात 19% वाढला, यापूर्वी दिला 876% परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! अल्पावधीत मालामाल करतील, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल HPCL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर खिसे भरणार, HPCL फ्री बोनस शेअर्स देण्याच्या तयारीत, खरेदीला गर्दी IREDA Share Price | PSU मल्टिबॅगर IREDA शेअरमध्ये प्रचंड घसरण होतेय, स्टॉक स्वस्तात Buy करावा की Sell? Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्स घसरले, स्टॉक घसरणीचे नेमकं कारण काय? स्टॉक Hold करावा की Sell? Tata Technologies Share Price | मल्टिबॅगर शेअर उच्चांकापासून 25% घसरला, स्वस्तात खरेदीची संधी? तज्ज्ञांचे BUY रेटिंग Bonus Shares | फ्री शेअर्सचा पाऊस पडणार! झटपट पैसा दुप्पट करणारा शेअर खरेदी करा, संधी सोडू नका
x

भाजपच्या आमदारांना निलंबित करण्यासाठी सरकारने खोटी स्टोरी रचली | फडणवीसांचा गंभीर आरोप

Devendra Fadnavis

मुंबई, ०५ जुलै | विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे. परंतु, पहिल्याच दिवशी अधिवेशनात प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला. सत्ताधारी आणि विरोधीपक्ष समोरा-समोर आले. तसेच विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये धक्काबुक्की पाहायला मिळाली. विरोधक आमदारांनी अध्यक्षांचा माईकही ओढला. या गैरवर्तनानंतर आज भारतीय जनता पक्षाच्या 12 आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन करण्यात आले आहे. आता यावर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली.

भारतीय जनता पक्षाच्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आल्यानंतर भारतीय जनता पक्षाने सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आणि सभात्याग केला. यानंतर माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे खोटी स्टोरी रचून भारतीय जनता पक्षाच्या 12 आमदारांचे निलंबन करण्यात आले असल्याचे फडणवीस म्हणाले.

106 आमदारांना निलंबित केले तरीही लढा देत राहू:
प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, आम्हाला ज्या गोष्टीची शंका होती. ती शंका सरकारने खरी केली आहे. आरक्षणाच्या मुद्यावर आम्ही सरकारला उघडे पाडले आहे. या मुद्द्यावरुन सरकार अपयशी ठरले असल्याचे आम्ही सरकारला दाखवले यामुळेच त्यांनी खोटी स्टोरी रचून खोटे आरोप लावून 12 आमदरांना निलंबित केले आहे. तसेच ओबीसींसाठी 12च आमदार काय आम्ही 106 आमदारांना निलंबित केले तरीही लढा देत राहू, असेही फडणवीस म्हणाले आहेत.

ओबीसींना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत भाजप संघर्ष सुरूच ठेवणार:
जोपर्यंत ओबीसीचे आरक्षण पुन्हा दिले जात नाही तोपर्यंत भारतीय जनता पक्षाचा संघर्ष सुरूच राहणार नाही. एक वर्ष नाही पाचही वर्ष आमचे या ठिकाणी सदस्यपद रद्द झाले तरीही आम्हाला काळजी नाही. आज सभागृहात जे पाहिलं, अनेक वेळा लोक यापूर्वी मंचावर चढले आहे. परंतु कधीही कुणाला निलंबित करण्यात आलेले नाही. नेहमीच अध्यक्षांच्या दालनात बाचाबाची होते. परंतु, कधीही कुणी निलंबित केले जात नाही. परंतु स्पष्टपणे सांगतो, स्टोरी तयार करुन हे निलंबन करण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाच्या एकाही सदस्याने शिवी दिलेली नाही आणि शिवी कोणी दिली हे देखील सर्वांनी पाहिले आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Mahavikas Aghadi government fabricated a false story to suspend BJP MLAs said opposition leader Devendra Fadnavis news updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x