5 May 2024 1:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Health Insurance Premium | हेल्थ इन्शुरन्स घेणाऱ्यांना धक्का! 10 ते 15 टक्क्याने वाढणार पॉलिसी प्रिमिअम Gold Rate Today | अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदीच विचार आहे? तनिष्क, मलबार ज्वेलर्स आणि कल्याण ज्वेलर्सचे दर जाणून घ्या Govt Employee Pension | सर्व पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट! SBI सहित 5 सरकारी बँकेत नवीन सुविधा सुरु, फायदा घ्या 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! HRA पासून ग्रॅच्युइटीपर्यंत फायदा, मोठी वाढ होणार Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा
x

नितेश राणेंचं आदित्य ठाकरेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य | शिवसैनिकांनी जोरदार राडा घालताच शब्द मागे

MLA Nitesh Rane

मुंबई, ०७ जुलै | राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर बोलताना भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांचा तोल गेला. काल विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भरविण्यात आलेल्या प्रतिविधानसभेत बोलताना आदित्य ठाकरे हे ठाकरे यांचे वंशज आहेत का? यासाठी त्यांची डीएनए टेस्ट करावी लागेल, असं वादग्रस्त आणि आक्षेपाचे वक्तव्य नितेश राणे यांनी केलं होतं. त्यानंतर मुंबईत शिवसैनिकांनी जोरदार राडा केला. आता त्यानंतर नितेश राणे यांच्याकडून ‘भावना दुखावल्या असल्यास शब्द मागे घेतो’ असं ट्विट करण्यात आलं आहे.

महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी भारतीय जनता पक्षाच्या 12 राडेबाज आमदारांवर निलंबनाची कारवाई केली. या निलंबनाच्या कारवाईचा निषेध करण्यासाठी विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कोणत्याही कामकाजात भारतीय जनता पक्ष आमदारांनी सहभाग घेतला नाही. विधानसभेच्या पायऱ्यांवर बसूनच भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी सरकारविरोधात आपला रोष व्यक्त केला. यावेळी भारतीय जनता पक्षाने प्रतिविधानसभा भरवली होती. इथेच भाषण करत असताना आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर अत्यंत खालच्या पातळीवर आक्षेपार्ह टीका केली.

 

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: BJP MLA Nitesh Rane Controversial statement on minister Aaditya Thackeray Yuva sena Agitation news updates.

हॅशटॅग्स

#Nitesh Rane(100)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x