5 May 2024 1:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Health Insurance Premium | हेल्थ इन्शुरन्स घेणाऱ्यांना धक्का! 10 ते 15 टक्क्याने वाढणार पॉलिसी प्रिमिअम Gold Rate Today | अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदीच विचार आहे? तनिष्क, मलबार ज्वेलर्स आणि कल्याण ज्वेलर्सचे दर जाणून घ्या Govt Employee Pension | सर्व पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट! SBI सहित 5 सरकारी बँकेत नवीन सुविधा सुरु, फायदा घ्या 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! HRA पासून ग्रॅच्युइटीपर्यंत फायदा, मोठी वाढ होणार Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा
x

मी आमदार असतो तर ५० टक्के जिव नक्कीच वाचविले असते | विजय औटींचा निलेश लंकेवर निशाणा

Former MLA Vijay Auti

मावळेवाडी , ०९ जुलै | संकटाचा सामना करायचा का संकटाला भिऊन घरात बसायचं ? म्हणजे चुकीचं वागा असा याचा अर्थ नाही. मुख्यमंत्री पदोपदी सांगतात मास्क वापरा, हात धुवा, सामाजिक अंतर पाळा. मुख्यमंत्र्यांच्या सुचना पाळायला का अडचण आहे आपल्याला ? नाही ? ‘त्यांच्यातच जाउन झोपन !’ कोणत्याही गोष्टीला एक सिमा असावी. माणसाने वागावं कसं ? तुम्ही अधिक कडक केले असते, प्रशासनाच्या मागे अधिक मजबुतपणे उभे राहिले असता तर काही जिव नक्कीच वाचले असते. मी तपशिलात जाणार नाही. त्यासाठी योग्य वेळ येऊ द्या. मी आमदार असतो तर ५० टक्के जिव नक्कीच वाचविले असते असा दावा करीत विधानसभेचे माजी उपाध्यक्ष मा. आ. विजय औटी यांनी आमदार नीलेश लंके यांच्यावर पुन्हा निशाणा साधला.

मावळेवाडी येथील ३ कोटी ७९ लाख रूपये खर्चाच्या रस्त्याचे औटी यांच्या हस्ते भुमिपुजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. माजी आमदार औटी पुढे म्हणाले, आपण कशाचं समर्थन करतो आहोत हे सुद्धा समजू नये ? म्हणून कधी कधी मनामध्ये चिड येते.

वेदना होतात, त्रास होतो. जे काही चाललंय ते काही योग्य चाललं नाही. अनेक आमदार मला फोन करून सांगतात. तुमचा विश्‍वास बसणार नाही अशा गोष्टी आहेत. म्हणून असं वाटतं कसं ऐवढं झाल ? ठीक आहे, १८, २०, २२ वर्षांची पोरं बिघडली. ‘ते’ बरं आहे म्हणाले. आजच्या परिस्थितीचा आढावा घ्या, बारकाईने, शांतपणे, त्रयस्तपणे घ्या. चुकलंय असं मान्य करायला लागलेत लोक. आता वेळ निघून गेली आहे. आपण आपल्या मतदारसंघापुरतं बोलतो.पुढचं आपल्याला माहीती नाही.

त्यांना त्यांच चालू ठेवायचंय बिघडवायचंय, मोडायचंय, तोडायचंय का पाडायचंय काय आपल्याला माहीती आहे ? वरच्यांच काय व्हायचं असेल ते होईल. हे सारं दुरूस्त करायचं असेल. तर भविष्य डोळयापुढे ठेऊन येणा-या जि. प., पं. स., नगरपंचायत निवडणूका जिंकायच्या असतील सत्तेचा बॅलन्स साधावा लागेल. ८०, ८२ हजार लोकांनी मला मतदान केलं. त्यांना जि.प. व पंचायत समितीमध्ये दोन दारं कुठेेतरी मी तयार करून दिल्याचे ते म्हणाले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Former MLA Vijay Auti criticized NCP MLA Nilesh Lanke news updates.

हॅशटॅग्स

#NileshLanke(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x