2 May 2024 9:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

Special Recipe | घरच्या घरी कसा बनवा टॉमॅटो केचप - वाचा रेसिपी

Home made tomato ketchup recipe

मुंबई, १५ जुलै | गरमागरम मॅगी असो किंवा सॅन्डव्हिच, समोसे, वडे, कोथिंबीर वडी,कट्लेस या सार्‍यांनीच चव अधिक वाढते ती म्हणजे टोमॅटो केचअपमुळे. बाजारात विविध स्वादांमध्ये टॉमॅटो केचअप उपलब्ध असतात. पण त्याचा स्वाद वाढवण्यासाठी अनेकदा त्यामध्ये प्रिझर्व्हेटीव्ह वापरले जातात. असा टोमॅटो केचअप लहान मुलांनी वरचे वर खाणं आरोग्याच्या दृष्टीने त्रासदायक ठरू शकते. म्हणूनच टोमॅटो कॅचअपची चव तशीच राखत घरच्या घरी टॉमॅटो कॅचअप कसा बनवावा ते आपण पाहणार आहोत. मग जाणून घ्या घरच्या घरी हेल्दी आणि टेस्टी स्टाईलने कसा बनवाल टोमॅटो केचअप.

टोमॅटो केचअपसाठी लागणारे साहित्य:
* 1 कप शिजवलेला लाल भोपळ्याचा पल्प
* 1 कप ताज्या टोमॅटोची प्युरी ( हे टोमॅटो वाफवू नका)
* 200 ग्रॅम पॅकेज्ड टोमॅटो प्युरी
* 1/3 कप साखर (टोमॅटोच्या आंबटपणानुसार साखरेचे प्रमाण कमी / जास्त होऊ शकते)
* 2 टीस्पून व्हिनेगर
* चिमुटभर मीठ
* 8 काळामिरीचे दाणे
* 4-6 लवंगा
* चिमुटभर चिली फ्लेक्स (गरज असल्यास) ( तुम्हांला टोमॅटो केचअप थोडा तिखट हवा असल्यास अधिक चिली फ्लेक्स वापरा)
* 4टीस्पून कांद्याची पावडर
* 1/2 टीस्पून लसणाची पावडर

संपूर्ण कृती:
* जाड स्टिल पॅनमध्ये साखर कॅरमलाईज्ड करा.
* प्रेशर कुकरमध्ये लाल भोपळ्याची प्युरी थोड्याश्या पाण्यामध्ये मिसळून थोडेसे शिजवा. शिजलेला भोपळ्याचा पल्प मिक्सरमध्ये एकत्र करा.
* त्यानंतर भोपळ्याची आणि टोमॅटोची प्युरी खोलगट भांड्यामध्ये एकत्र करून शिजवा.
* काही वेळाने त्यामध्ये पॅकेज्ड प्युरीदेखिल मिसळा. हे मिश्रण घट्ट होईपर्यत शिजवणे गरजेचे आहे.
* थोड्या वेळाने साखरेचे कॅरेमल,व्हिनेगर,आणि इतर मसाले,मीठ व कपभर पाणी मिसळा. त्यानंतर पुन्हा हे मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा.
* सारे मिश्रण साधारणपणे सुमारे 45 मिनिटं हे मिश्रण नीट शिजवणं गरजेचे आहे. मिश्रण घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करा.
* त्यानंतर सारे मिश्रण नीट एकजीव करून गाळणीने गाळून घ्या.
* गाळलेले मिश्रण नैसर्गिकरित्या थंड होऊ द्यावे.
* थंड झालेले मिश्रण काचेच्या बरणीमध्ये साठवून ठेवा.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Home made tomato ketchup recipe in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x