7 May 2024 10:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 08 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Jindal Stainless Share Price | मल्टिबॅगर 307% परतावा देणारा स्टॉक 'खरेदी' करण्याचा सल्ला, अल्पावधीत 30% परतावा मिळेल BHEL Share Price | PSU BHEL स्टॉकवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून मालामाल करणारी मजबूत टार्गेट प्राईस जाहीर Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकचार्ट काय संकेत देतोय? या प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांचा इशारा काय? Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची मजबूत परतावा देणारी योजना, बचतीवर रु.56,830 फक्त व्याज मिळेल SBI Mutual Fund | नोट छापायची मशीन आहे ही SBI म्युच्युअल फंड योजना, 5,000 च्या SIP वर 1.37 कोटी रुपये परतावा Waaree Renewables Share Price | 2 रुपयाच्या शेअरची कमाल! 4 वर्षात दिला 137000% परतावा, खरेदी करणार?
x

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुन्हा नागरिकांशी संवाद साधणार

Corona Crisis, Covid 19, PM Narendra Modi

नवी दिल्ली, २ एप्रिल: शुक्रवारी सकाळी म्हणजेच उद्या सकाळी ९ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासीयांना एक विशेष संदेश देणार आहेत. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.आजच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आणि देशांमधल्या राज्यांमध्ये करोनाची काय स्थिती आहे ते जाणून घेतले. आता उद्या सकाळी ९ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत. ते काय बोलणार हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

देशव्यापी लॉकडाऊनचा आजचा नवव्या दिवशीही करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली दिसून येतेय. गेल्या २४ तासांमध्ये एकूण ३२८ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत २९ राज्यांमध्ये एकूण रुग्णांची संख्या १९६५ इतकी झाली आहे. आत्तापर्यंत ५० रुग्णांचा मृत्यू झाला. यातील गेल्या २४ तासांमध्ये करोनाच्या एकूण १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सकारात्मक गोष्ट म्हणजे १५१ लोक बरे झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे.

देश लॉकडाऊन करण्याची घोषणा केल्यानंतर मोदी सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध कल्पना शेअर करत आहेत. लॉकडाऊनच्या काळात काय करावं, कोरोनापासून बचाव करण्यासाठी नेमकी काय काळजी घ्यावी, याच्या टिप्स मोदी ट्विटरच्या माध्यमातून देत आहेत. लॉकडाऊनमुळे कोट्यवधी लोकांना घरीच राहावं लागत आहे. या दिवसांचा सदुपयोग करावा, योगासनं करावीत, अशा काही टिप्स मोदींनी देशवासीयांना दिल्या आहेत. या संदर्भातले काही व्हिडीओदेखील त्यांनी ट्विट केले आहेत.

 

News English Summary: Prime Minister Narendra Modi will deliver a special message to the people on Friday morning at 9am. ANI has reported the matter in this regard. Today, Prime Minister Narendra Modi interacted with the Chief Ministers of all the states through video conferencing and learned about the status of Karunas in the states between the countries. Prime Minister Narendra Modi will address the country at 9 AM tomorrow. It would be very important to see what they would say.

 

News English Title: Story Prime Minister Narendra Modi will share video message Corona Crisis Covid 19 on 3 March 2020 News latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x