3 May 2024 6:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

इटलीचे पंतप्रधान ज्यूसपे कॉन्टे यांच्याकडून १२ महिन्यांसाठी आणीबाणी जाहीर

जेनोआ : इटलीची राजधानी जेनोआ येथे आलेल्या जोरदार वादळाच्या तडाख्याने मोरांडी पूल कोसळला आहे. परंतु त्यामुळे पूलाखालील असलेल्या वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. दुर्दैवाने या भयानक अपघातात तब्बल ३९ लोकांचा मृत्यू झाला आहे.

त्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे पंतप्रधान ज्यूसपे कॉन्टे यांनी १२ महिन्यांसाठी आणीबाणीची घोषणा केली आहे. तसेच या दुर्घटनेत मृत्य पावलेल्या लोकांसाठी जवळपास ४० कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. त्यांनतर बचावकार्य सुद्धा जोरात सुरु असून परिस्थिती कशी आटोक्यात आणली जाईल याकडे प्रशासनाचे लक्ष आहे.

जिनोआमध्ये अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसत आहे. त्यात मंगळवारी मुसळधार पावसाबरोबरच वादळाचा जोरदार तडाखा बसल्याने मोरांडी पुलाचा मोठा म्हणजे जवळजवळ ६०० फुटाचा भाग कोसळला. त्यात ३५ गाडय़ा आणि अनेक ट्रक ४५ मीटर खाली असलेल्या रेल्वे मार्गावर कोसळल्या, यात ३९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मोरांदी पुलाच्या देखरेखीची जबाबदारी ऑटोस्ट्रेड या कंपनीवर देण्यात आली होती. त्यामुळे या कंपनीची मान्यताही काढून घेण्यात येणार असून, पुलाची जबाबदारी असलेल्या ऑटोस्ट्रेड कंपनीला १५० दशलक्ष युरोचा दंड ठोठावण्यात आला आहे अशी घोषणा पंतप्रधानांनी केली आहे.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x