5 May 2025 5:41 PM
अँप डाउनलोड

Ashadhi Ekadashi 2021 | मुख्यमंत्र्यांकडून सपत्नीक विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा संपन्न

Ashadhi Ekadashi 2021

पंढरपूर, २० जुलै | वारकऱ्यांनी तुडुंब भरलेली आषाढी यात्रा पंढरपुराने पाहिली आहे. तीच वारी आम्हाला परत पाहायला मिळाली पाहिजे. ‘हे विठ्ठला कोरोनाची संकट लवकरात लवकर दूर कर आणि आम्हाला पूर्वीप्रमाणे आषाढी वारी, वारकऱ्यांनी तुडुंब भरलेली पंढरी पाहू दे’ असे साकडे पांडुरंग चरणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातले आहे.

विठ्ठलाची शासकीय महापूजा सपत्नीक मुख्यमंत्र्यांचा हस्ते:
सावळ्या विठ्ठलाची आज मंगळवारी पहाटे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक शासकीय महापूजा केली. त्यावेळी मानाचे वारकरी केशव कोलते आणि इंदुमती कोलते यांना मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान मिळाला. त्यानंतर विठ्ठल मंदिर समितीकडून मुख्यमंत्र्यांचा समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मानाचे वारकरी ठरलेली केशव कोलते व इंदुमती कोलते यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संत कान्होपात्राचे वृक्षारोपण झाले. मंदिर समितीकडून तयार करण्यात आलेल्या प्रतिमेचा यावेळेस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, विशेष कार्यकारी अधिकारी मिलिंद नार्वेकर, पालकमंत्री दत्तामामा भरणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

केशव कोलते व इंदुमती कोलते महापूजेचे मानाचे वारकरी:
आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय पूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते पार पडली. यावेळी विठ्ठलाची पूजा मुख्यमंत्र्यांकडून भक्तिभावाने करण्यात आली. ही पुजा सुमारे अर्धा तास सर्व विधी विधानानुसार करण्यात आली. त्यांच्या सोबत मानाचे वारकरी असणाऱ्या केशव कोलते व इंदुमती कोलते यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत पूजेचा मान मिळाला.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Ashadhi Ekadashi 2021 CM Uddhav Thackeray with wife Rashmi Thackeray performs Vitthal Rakhumai Mahapooja at Pandharpur news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#AshadhiEkadashi(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या