7 May 2024 8:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 08 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Jindal Stainless Share Price | मल्टिबॅगर 307% परतावा देणारा स्टॉक 'खरेदी' करण्याचा सल्ला, अल्पावधीत 30% परतावा मिळेल BHEL Share Price | PSU BHEL स्टॉकवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून मालामाल करणारी मजबूत टार्गेट प्राईस जाहीर Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकचार्ट काय संकेत देतोय? या प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांचा इशारा काय? Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची मजबूत परतावा देणारी योजना, बचतीवर रु.56,830 फक्त व्याज मिळेल SBI Mutual Fund | नोट छापायची मशीन आहे ही SBI म्युच्युअल फंड योजना, 5,000 च्या SIP वर 1.37 कोटी रुपये परतावा Waaree Renewables Share Price | 2 रुपयाच्या शेअरची कमाल! 4 वर्षात दिला 137000% परतावा, खरेदी करणार?
x

पालकांनो | तुमच्या मुलाला मिळणारं शालेय पोषण आहार अनुदान रक्कम थेट तुमच्या खात्यात

Shaleya Poshan Ahar Yojana 2021

मुंबई, 22 जुलै | शेतकरी बंधुंनो शालेय पोषण आहार अनुदान रक्कम थेट पालकांच्या खात्यात जमा होणार आहे. तुमचा मुलगा शाळेत जात असेल आणि तो इयत्ता पहिली ते आठवीमध्ये असेल तर हा खास लेख तुमच्यासाठी आहे कारण आता इयत्ता पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये पोषण आहार न देता आल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये पोषण आहाराच्या बदल्यात पैसे जमा करण्यात येणार असून राष्ट्रीयकृत बँकेत खते उघडण्याची अट शिथिल करण्यात आलेली आहे.

पोस्टातील खात्यातही अनुदान रक्कम जमा केली जाणार:
उन्हाळ्याच्या सुट्टी मध्ये पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार देता न आल्यामुळे अशा सर्व शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याचे निर्देश शासनातर्फे देण्यात आले आहेत. यासाठी विद्यार्थ्यांचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडण्याची अट होती. हि अट आता शिथिल करीत विद्यार्थ्यांच्या पालकांच्या बँक अथवा पोस्टातील खात्यातही अनुदान रक्कम जमा केली जाणार आहे. शालेय शिक्षण विभागाने सर्व शिक्षण अधिकाऱ्यांना पत्र पाठवून उन्हाळ्याच्या सुट्टीतील पस्तीस दिवसांची शालेय पोषण आहाराची रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार जोडणी केलेल्या खात्यात जमा करण्याचे निर्देश दिले होते. तसेच सर्व विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक जोडलेल्या बँक खात्याची यादी नऊ जुलै पर्यंत तयार करण्याचे निर्देश होते.

शालेय पोषण आहार अनुदान रक्कम लवकरच मिळणार:
अनेक विद्यार्थ्यांचे बँकेत बचत खाते नाहीत. शिक्षक संघटनांनी पालकांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात यावीत किंवा पोस्ट पेमेंट बँकेत खाते उघडण्याची मुभा देण्यात यावी अशी मागणी केली होती. दरम्यान शिक्षक व विद्यार्थ्यांच्या पालकांची मागणी लक्षात घेऊन शालेय शिक्षण विभागाने सर्व शिक्षक शिक्षण उपसंचालकांना नवीन पत्र पाठवून आता विद्यार्थी-पालक संयुक्त खाते, पालकांची खाते अथवा विद्यार्थ्यांच्या खाते यापैकी कोणतेही खाते चालणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यात आधार क्रमांक नसलेल्या विद्यार्थ्यांची तातडीने आधार नोंदणी करून घेणे तो क्रमांक बँक खात्याशी जोडण्याची निर्देश दिले असून पोस्ट बँकेचे खाते पोषण आहाराची रक्कम जमा करण्यासाठी पात्र असल्याचे स्पष्ट केले आहे.

खालीलप्रमाणे मिळणार शालेय पोषण आहार अनुदान:
* इयत्ता पहिली ते पाचवीतील विद्यार्थ्यांना मिळणार १५६ रुपये.
* सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मिळेल २३४ रुपये.
* पहिली ते पाचवी पर्यंत विद्यार्थी संख्या २२,९६४.

अधिकृत बातमी येथे क्लिक करून वाचा किंवा पुढील लिंक कॉपी करून वाचा: https://www.maharashtranama.com/wp-content/uploads/News.jpeg

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Maharashtra Shaleya Poshan Ahar Yojana 2021 benefits in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#SarkariYojana(112)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x