3 May 2024 7:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

Health First | प्लॅस्टिकमध्ये गुंडाळलेली सॅन्डव्हिचेस या घातक कारणांसाठी टाळा - नक्की वाचा

avoid eating packaged sandwiches

मुंबई, २३ जुलै | घाईत घराबाहेर पडताना अनेकदा सॅन्डव्हिच किंवा रॅप्स हे प्लॅस्टिकमध्ये गुंडाळले जातात. अशाप्रकारे प्लॅस्टिकमध्ये गुंडाळलेले पदार्थ खाणे आरोग्यावर दुष्परिणाम करू शकतात. म्हणूनच अशाप्रकारे ठेवलेले पदार्थही का विकत घेऊन खाऊ नये हे जाणून घेण्यासाठी आहारतज्ञ प्रिया काथपाल यांचा हा विशेष सल्ला नक्कीच जाणून घ्या.

फ्रीजमधील पदार्थ:
रस्त्यावर किंवा मॉल्समध्ये मिळणारी अनेक सॅन्डव्हिचेस ही विक्रीपूर्वी बनवून ठेवलेली असतात. त्यामध्ये अंड, मांस किंवा पनीरचा समावेश असतो. ते फ्रेश राहण्यासाठी आणि टिकवण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवली जातात. सामान्यपणे 2-3 दिवसांपेक्षा अधिक काळ पदार्थ फ्रिजमध्ये ठेऊन खाऊ नये. परंतू आपल्याला विकले जाणारे सॅन्डव्हिच कधी बनवले आहे. याची आपल्याला माहिती नसते. साठवलेल्या पदार्थांमधून पोषकतादेखील कमी झालेली असते.

तापमान:
शिजवलेल्या जिन्नसांचा, भाज्यांचा समावेश असलेली सॅन्डव्हिचेस योग्य तापमानात साठवली नाहीत तर ती लगेजच खराब होऊ शकतात.

कॅलरी काऊंट:
सॅन्डव्हिचेस किंवा रॅप्स बनवताना त्यामध्ये अधिक प्रमाणात मेयॉनीज, बटर वापरले जाते. यामधून सहाजिकच कॅलरीज वाढतात. त्यामुळे जर तुम्ही वेट लॉसच्या मिशनवर असाल तर यामुळे नुकसान होऊ शकते.

पॅकेजिंग:
प्लॅस्टिकच्या cling film मध्ये पदार्थ गुंडाळून ठेवणेदेखील सुरक्षित नाही. झुरळं, माश्या यांचा किचनमध्ये वावर असतो. त्याप्रमाणेच टोमॅटो किंवा व्हिनेगर यासारख्या अ‍ॅसिडीक पदार्थांमुळे प्लॅस्टिकच्या फिल्मशी रिअ‍ॅक्शन होऊ शकते. यामुळे मॉईश्चर किंवा बॅक्टेरियांची वाढ होते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Why to avoid eating packaged sandwiches in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x