5 May 2025 7:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon India Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडणारी योजना, 1 लाख बचतीचे 45 लाख होतील, तर SIP वर 1.06 कोटी मिळतील Horoscope Today | 06 मे 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 06 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या TTML Share Price | 51 टक्के परतावा मिळेल, आज शेअरमध्ये 4.01% तेजी, गुंतवणूकदार तुटून पडले - NSE: TTML Adani Port Share Price | 34 टक्के कमाई करा, आज 6.27% वाढला, अदानी पोर्ट शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPORTS RVNL Share Price | झटपट मोठी कमाई होईल, पीएसयू शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL BHEL Share Price | या मल्टिबॅगर पीएसयू शेअरला तज्ज्ञांनी दिली BUY रेटिंग, मिळेल इतका मोठा परतावा - NSE: BHEL
x

Special Recipe | घरच्याघरी झणझणीत शेजवान फ्राईड राईस बनवा - वाचा रेसिपी

Schezwan fried rice recipe

मुंबई, २४ जुलै | शेजवान फ्राईड राईस ही अशी डिश आहे, ज्याचे नाव ऐकताच त्याच्या तोंडातून पाणी येते. आजच्या काळात हे एक लोकप्रिय खाद्य आहे जे रेस्टॉरंट्स इत्यादी मध्ये सहज उपलब्ध आहे. तथापि, घरांमधील महिला त्यांच्या स्वत: च्या स्टाईलमध्ये शेजवान फ्राईड राईस बनवतात. त्यात जर आपण आपल्या आहारात काही झणझणीत करण्याचा विचार करत असाल तर आपण शेजवान फ्राईड राईस बनवू शकता.

संपूर्ण साहित्य:
* ७० ग्रॅम बासमती तांदूळ
* 1 लहान कांदा
* १+१/२ टेबलस्पून पत्ता कोबी
* १+१/२ टेबलस्पून गाजर
* 1 टेबलस्पून सिमला मिरची
* १+१/२ टेबलस्पून कांदा पात
* 7-8 लसुण पाकळ्या
* 1/2 इंच आलं
* 1 टेबलस्पून शेजवान सॉस
* 1 टीस्पून सोया सॉस
* 1 टीस्पून टोमॅटो सॉस
* 1/2 टीस्पून चीली सॉस
* 1 टेबलस्पून तेल
* मीठ चवीनुसार

संपूर्ण कृती:
1. प्रथम बासमती धान तांदूळ स्वच्छ धुऊन पाणी घालून कुकरमध्ये शिजवून घेतला शिजवताना त्यात थोडे तूप घातले म्हणजे भात मोकळा होतो.

2. कांदा, गाजर, सिमला मिरची, कांदा पात, कोबी या भाज्या बारीक चिरून घेतल्या लसूण व आले दोन्ही बारीक चिरून घेतले. गॅसवर कढईमध्ये तेल गरम करून त्यात लसुन आलं परतून घेतले.

3. आता कांदा परतून मग त्यात गाजर, सिमला मिरची, पत्ताकोबी हे परतले. मग त्यात भात मिक्स केला. त्यात शेजवान, टोमॅटो, सोया हे सर्व सॉस क्रमाने घालून घेतले. व मिरपुड व थोडे मीठ मिक्स करून परतले.

4. आता सर्व मिक्स करून भात तयार झाल्यावर डिश मध्ये काढून त्यावर कांदा पात घालून सर्व्ह केले

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Schezwan fried rice recipe in Marathi news updates.

ताज्या बातम्यांसाठी महाराष्ट्रनामा मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा: Click Here to Download

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या