3 May 2024 11:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Money | नोकरदारांनो! पगारातून EPF कापला जात असेल तर खात्यात 50,000 रुपये मिळतील, जबरदस्त फायदा Gratuity on Salary | पगारदारांनो! 35,000 रुपये पगार असणाऱ्यांना 1,41,346 रुपये ग्रॅच्युइटी मिळेल, अपडेट जाणून घ्या Post Office Scheme | फायदाच फायदा! दररोज फक्त 250 रुपयांची बचत करा, मिळेल 24 लाख रुपये परतावा 8th Pay Commission | खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच 8'वा वेतन आयोग लागू होणार, पगारात किती वाढ होणार? Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा
x

भास्कर जाधव, कोकणी माणूस जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही - शालिनी ठाकरे

MLA Bhaskar Jadhav

मुंबई, २६ जुलै | कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थितीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी रविवारी मुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांनी दौरे काढले. या दाैऱ्यात सर्वच नेत्यांनी मदतीच्या आश्वासनांचा ‘पूर’ आणला. मात्र प्रत्यक्षात आपत्तीग्रस्तांसाठी मदत किती व केव्हा मिळणार याबाबत मात्र कुणीही स्पष्टपणे सांगितले नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमधील नुकसानीची पाहणी केली. त्यांच्यासोबत पालकमंत्री अनिल परब व सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत व शिवसेना खासदार विनायक राऊत होते.

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन शिवसेनेचे आमदार आणि तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी गाजवले. पुन्हा एकदा राज्यातील पुरग्रस्त परिस्थितीमुळे शिवसेना आमदार भास्कर जाधव हे चांगलेच चर्चेत आले आहेत ते त्यांच्या उद्दामपणामुळे. मदत पूरग्रस्त भागात मदतीची याचना करणाऱ्या महिलेशी त्यांनी उद्दामपणे केलेली वागणूक आणि त्यासंदर्भातला व्हीडिओ हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चिपळूणमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दौरा होता. त्यावेळी एक महिला आपली व्यथा मुख्यमंत्र्यांसमोर मांडत होती. त्यावेळी भास्कर जाधव यांनी या महिलेला दिलेल्या वागणुकीमुळे त्यांच्यावर टीका होते आहे. आता मनसे्च्या नेत्या शालिनी ठाकरे यांनीही भास्कर जाधव यांच्या या कृतीचा निषेध नोंदवला आहे.

काय म्हटलं आहे शालिनी ठाकरेंनी?
या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी ट्विटरवरुन भास्कर जाधावांना इशारा दिलाय. “भास्कर जाधव, आज त्या अगतिक महिलेवर जो हात उघारलाय ना…? तोच हात पुढच्या पाच वर्षांनी जोडून जेव्हा मतं मागायला याल, तेव्हा हाच कोकणी माणूस तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही,” असं शालिनी ठाकरे म्हणाल्या आहे.

नेमकं प्रकरण काय?
चिपळूणच्या बाजारपेठेत उद्धव ठाकरे एका दुकानासमोर जाऊन पीडित जनतेशी संवाद साधत होते. त्याचवेळेस एका दुकानासमोर आले असता तिथं एक महिला बराच वेळ आक्रोश करत होती. मुख्यमंत्र्यांचं लक्ष त्या महिलेकडे गेलं. मुख्यमंत्र्यांना आपली व्यथा सांगताना या महिलेच्या डोळ्यातले अश्रू काहीकेल्या थांबत नव्हते.

पीडीत महिला म्हणाली, ‘तुम्ही काहीपण करा, आमदार, खासदारांचा एक महिन्याचा पगार फिरवा, पण आमचं नुकसान भरून द्या;. मुख्यमंत्री त्या महिलेला धीर देण्याचा प्रयत्न करत असतानाच आमदार भास्कर जाधव मध्ये पडले. महिला मुख्यमंत्र्यांकडे आपली व्यथा मांडत असताना…भास्कर जाधवांनी महिलेला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. ‘हे बघा आमदार खासदार पाच महिन्याचा पगार देतील. त्याने काही होणार नाही. चला चला…बाकी काय… तुझा मुलगा कुठंय? अरे आईला समजव…आईला समजव…उद्या ये’, असं भास्कर जाधव बोलले. त्यांचा हाच व्हीडिओ आणि त्यामध्ये केलेलं उद्दाम वर्तन हा टीकेचा विषय ठरतो आहे.

मनसेने आता कोकणी माणूस तुम्हाला जागा दाखवेल असं म्हणत भास्कर जाधव यांना इशाराच दिला होता.पूरग्रस्त महिला अत्यंत कळकळीने मुख्यमंत्र्यांना तिची व्यथा सांगत होती आणि मदतीसाठी याचना करत होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अत्यंत शांतपणे तिला समजावत होते त्याचवेळी भास्कर जाधव मधे पडले आणि त्यांनी या महिलेशी उद्दाम वर्तन केलं. याचा सोशल मीडियावर तीव्र निषेध नोंदवला जातो आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: MNS leader Shalini Thackeray target Shivsena MLA Bhaskar Jadhav news updates.

ताज्या बातम्यांसाठी महाराष्ट्रनामा मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा: Click Here to Download

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x