28 April 2024 6:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

फडणवीसांच्या दत्तक नाशिकमध्ये मनसेचा स्वबळाचा नारा | भाजपसोबत युती नाहीच - संदीप देशपांडे

Raj Thackeray

नाशिक, २८ जुलै | शिवसेनेसोबत राजकीय अंतर वाढल्याने भारतीय जनता पक्षाचे नेते राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबतच्या जवळीक वाढण्यावर वारंवार वक्तव्य करताना दिसत आहेत. अगदी फडणवीसांपासून चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात जर तर जोडत मोठी वक्तव्य केली आहेत. त्यामुळे मोठा राजकीय संभ्रम पाहायला मिळत होता. मात्र याच संभ्रमावर मनसेतून मोठं वक्तव्य समोर आलं आहे. कारण या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. कारण नाशिकमध्ये मनसे स्वबळावर लढणार आहे, अशी माहिती मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिली आहे.

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि मनसे नेते अमित ठाकरे हे आज नाशिकच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी संदीप देशपांडे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी ही माहिती दिली. अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात मनसे नाशिकमध्ये कमबॅक करेल. मागील ५ वर्षात नाशिककरांची पुरती निराशा झाली आहे. दत्तक घेऊ ही योजनाही फेल गेली आहे, असा टोला संदीप देशपांडे यांनी भाजपला लगावला.

नाशिकमध्ये मनसे स्वबळावरच लढणार आहे. सध्या तरी आमच्याकडे कुणाकडूनही युतीचा प्रस्ताव आलेला नाही, असं सांगतानाच राज ठाकरे यांनी नाशिकचं मनापासून संगोपन केलं आहे. जुन्या-नव्या कार्यकर्त्यांचा संगम घडवून पुन्हा एकदा आम्ही नाशिकमध्ये कमबॅक करणार आहोत, असं त्यांनी सांगितलं.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: MNS party will not make alliance with BJP in Nashik said MNS leader Sandeep Deshpande news updates.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x