सांगली, २८ जुलै | अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील लोकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. महापूरमुळे अनेक लोकांचा संसार उघड्यावर आले असून यामध्ये बऱ्याच लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. परंतु, दुसरीकडे सांगलीतून एक खूपच भीतीदायक व्हिडिओ समोर आला आहे. मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागातील एक मजली घर पाण्यात बुडाले होते.

परंतु, जेव्हा हळूहळू पाणी ओसरु लागले तेंव्हा घराच्या छतावर एक मगर फिरताना काही लोकांनी पाहिले. दरम्यान, या व्हिडिओमध्ये एक मगर छतावरुन उडी मारताना दिसत आहे. यावितिरिक्त गेल्या तीन दिवसांत शहरातील विविध निवासी भागात मगरी पाण्यात फिरत असल्याचे आढळून आले आहे.

सांगलीतील जनता या पुरामुळे आधीच त्रस्त आहे. अशा परिस्थितीत आता वन्य प्राण्यांच्या आगमनाने त्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये एक मगर घराच्या छतावर बसलेली दिसत आहे. दरम्यान, काही लोक येथून नावेतून प्रवास करत असतात. हे सर्व पाहून ते लोक घाबरुन जातात.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Fact after Sangli flood due to heavy rain news updates.

सांगलीतील पुरस्थितीनंतर | नदी पात्रातील मगर रस्ते आणि घराच्या छतावर