मुख्यमंत्र्यांची ‘महाजनादेश यात्रा’ आपल्या मतदारसंघातून जावी यासाठी सेनेच्या आमदार व मंत्र्यांची विनंती
मुंबई : लवकरच राज्यात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या असल्या तरी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पक्षाचे अंतर्गत मनसुबे भलतेच असू शकतात याची शिवसेनेला देखील पूर्व कल्पना असणार. त्यात लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला मिळालेलं यश देखील मोदीमुळेच आहे असं भाजपचे अनेक नेते पडद्याआड बोलून दाखवत आहेत, तर शिवसेनेचे अनेक खासदार देखील ते पाठीमागे मान्य करतात.
मुंबईतील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी म्हणाले की, स्वबळावर लढावे, असा आग्रह मुंबईतही आहे. दिल्लीत नरेंद्र, राज्यात देवेंद्र लोकांनाच हवे असल्याचे कार्यकर्ते म्हणवतात. सेनेला सोबत घेतले तर पुन्हा त्रास सहन करावा लागेल, अशी भावना आहे. सेनेचे आमदार, मंत्री मागताहेत महाजनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘महाजनादेश यात्रा’ १ ऑगस्टपासून सुरू होत आहे. ती आपल्या मतदारसंघातून जावी यासाठी शिवसेनेचे काही आमदार आणि मंत्र्यांनीही मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
युतीचा अंदाज येत नसल्याने आघाडीचे आमदार थांबले काँग्रेस, एनसीपीतून बाहेर पडू इच्छिणाºया ७५ टक्के आमदारांचा कल हा भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचा आहे; पण त्यांच्यापैकी काहींचे मतदारसंघ पूर्वीचे शिवसेनेच्या कोट्यातील आहेत. भाजपने ती जागा शिवसेनेकडून स्वत:च्या कोट्यात घ्यावी; कारण आपल्याला भारतीय जनता पक्षाकडूनच लढायचे आहे, असे या आमदारांचे म्हणणे आहे. तसे होत नाही तोवर पक्षांतराचा निर्णय त्यांनी रोखून धरला आहे.
त्यामुळेच लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्य यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र त्यापूर्वीच शिवसेनेने आदित्य ठाकरे यांची ‘जण आशीर्वाद’ यात्रा सुरु केली आहे, ज्याचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. भाजपचा इतर राज्यातील अनुभव पाहता ते सहकारी पक्षालाच एकाकी पाडून आयत्यावेळी धाडसी निर्णय घेतात. लोकसभेच्या निकालानंतर तीच अवस्था बिहारमध्ये नितीश कुमार यांच्याबाबतीत पाहायला मिळाली. मात्र तेथे लोकसभा आणि विधानसभा एकत्र झाल्याने जेडीयू’च्या बाबतीत आयत्यावेळी भारतीय जनता पक्षाला काही करण्यास संधी मिळावी नव्हती.
महाराष्ट्रात विधानसभा लोकसभेसोबत झाली नाही, मात्र निकालानंतर भाजपने देशभर मोठी मुसंडी मारली. कॉग्रेस पक्ष लोकसभेत जवळपास शून्य झाला असून आगामी विधानसभा निवडणुकीत राहुल गांधी यांच्या सभा देखील कुचकामी ठरणार हे भाजपाला माहित आहे. त्यामुळे प्रचारात काँग्रेसकडे नैर्तृत्वच नाही अशी परिस्थिती आहे. तर लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशातील वायएसआर काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना जवळ केल्याने २०२४ मध्ये शिवसेनेचा दिल्लीतील पर्याय भाजपने शोधल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली होती.
दरम्यान पुढचा मुख्यमंत्री कोण असणार, यावरून शिवसेना-भारतीय जनता पक्षामध्ये कलगितुरा रंगला आहे. तर दुसरीकडे युती होणार असल्याचा दावा भारतीय जनता पक्षाची मंडळी करीत असली तरी मागचा अनुभव लक्षात घेता सावध झालेल्या शिवसेनेने यावेळी स्वबळाची चाचपणी सुरू केल्याची माहिती पुढे येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी रायगडमधील शिवसेनेच्या पदाधीकाऱ्यांची बैठक मातोश्रीवर घेतली होती. रायगडपाठोपाठ मंगळवारी पालघर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना मातोश्रीवर पाचारण करण्यात आले होते.
तर दुसरीकडे, जनआशीर्वाद यात्रेचा पहिला टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण करून युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे मुंबईत परतले आहेत. मागील आठवडयात जनआशीर्वाद यात्रेला मिळालेला प्रतिसाद, आगामी काळातील तयारी यावर ते शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि वडिल उद्धव ठाकरे यांच्याशी सविस्तर चर्चा करणार असल्याची माहिती शिवसेनेच्या सूत्रांनी दिली होते.
आदित्य यांच्या प्रवासाचा पहिला टप्पा शिवसेनेचे खासदार संजय राउत यांच्या कार्यक्षेत्रात होता. ते ज्या जिल्हयांचे संपर्कप्रमुख आहेत त्याच जिल्हयात पहिल्या टप्प्यात प्रवास झाल्याने यात्रेला आक्रमक रूप प्राप्त झाले. आदित्य हे राज्याचे नेतृत्व करू शकतात, ते भावी मुख्यमंत्री आहेत, शिवसेनेला अर्ध्या काळासाठी मुख्यमंत्रीपद मिळणार आहे, असे आक्रमकपणे मांडण्यात आल्याने भारतीय जनता पक्षात काहीशी अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळे सेनेचे मनसुबे देखील वेगळेच असल्याचं भारतीय जनता पक्षाला वाटत आहे. त्यामुळे कोणतीही वाच्यता न करत दोन्ही पक्ष स्वबळाच्या तयारीला लागले आहेत असं वृत्त आहे.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News