15 May 2024 1:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसच्या या योजनेत ₹2000, ₹3000 किंवा ₹5000 बचतीवर किती परतावा मिळेल? नोट करा NBCC Share Price | मालामाल होण्याची संधी! NBCC शेअरसहित हे 4 शेअर्स 50% पर्यंत परतावा देतील, स्टॉक सेव्ह करा Penny Stocks | एक वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, सेव्ह करा टॉप 10 पेनी स्टॉकची यादी Vodafone Idea Share Price | 13 रुपयाचा शेअर देईल 100% परतावा, एक बातमी येताच स्टॉक खरेदीला तुफान गर्दी Reliance Power Share Price | 26 रुपयाचा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, यापूर्वी अल्पावधीत दिला 2168% परतावा Old Tax Regime | पगारदारांनो! जुन्या टॅक्स प्रणालीचा लाभ घेण्यासाठी या तारखेपर्यंत भरा ITR, किती फायदा होईल पहा Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

पेगासस प्रकरण | संसदेत मोदी सरकारची डोकेदुखी वाढू लागल्याने गडकरी पोहोचले पवारांच्या भेटीला

Sharad Pawar

नवी दिल्ली, ३० जुलै | दिल्लीत सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशना दरम्यान दिल्लीत अनेक राजकीय हालचाली सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर एक मोठी घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत शरद पवारांच्या निवासस्थानी भेट झाली आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुचनेनुसार ही बैठक झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, राजकारणातील या दोन दिग्गज नेत्यांच्या बैठकीमुळे चर्चा तर सुरु झालीच आहे. शिवाय अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत.

या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये संसदेतील गोंधळावर मार्ग काढण्यावर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान राज्यातील परिस्थितीवरही चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. पावसाळी अधिवेशन सुरु झाल्यापासून विरोधक गदारोळ घालत आहेत. त्यामुळे संसदेचं कामकाज होत नसल्याचं दिसून येत आहे. यावरच मार्ग काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नितीन गडकरींना याबाबतची जबाबदारी सोपवली आहे. याचाच एक भाग म्हणून नितीन गडकरींनी शरद पवारांची भेट घेतली आहे.

दुसरीकडे, राज्यसभेतील गटनेते पियुष गोयल व संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी विरोधकांशी समन्वय साधण्यासाठी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी संपर्क साधला मात्र केंद्र सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये तडजोड होऊ शकली नाही.

संसदेतील कोंडी फुटणार?
पेगासस प्रकरणावरून विरोधक प्रचंड आक्रमक झाले आहेत. विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं असून त्यामुळे संसदेचं कामकाज होताना दिसत नाहीये. पेगाससवर संसदेत चर्चा व्हावी आणि पंतप्रधान किंवा गृहमंत्र्यांनी त्यावर उत्तर द्यावं, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. त्यामुळे संसदेतील ही कोंडी फोडण्यासाठीच गडकरी यांनी पवारांची भेट घेतल्याचं सांगितलं जातं. या भेटीत महाराष्ट्रातील विकास प्रकल्प आणि पूरस्थितीवरही चर्चा झाल्याचं सांगितलं जातं.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Union minister Nitin Gadkari meet NCP president Sharad Pawar over parliament session news updates.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x