9 May 2025 6:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 10 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rattan Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक 52-वीक लो लेव्हल जवळ, अपडेट जाणून घ्या - NSE: RTNPOWER IRB Infra Share Price | कंपनीच्या टोल उत्पन्नात वाढ; शेअर प्राईसवर होणार सकारात्मक परिणाम - NSE: IRB NTPC Share Price | एनटीपीसी शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर, मंदीत स्वस्तात BUY करा - NSE: NTPC AWL Share Price | मल्टिबॅगर शेअरमध्ये मोठ्या तेजीचे संकेत, ग्लोबल ब्रोकिंग फर्म बुलिश - NSE: AWL Mazagon Dock Share Price | युद्धाचे ढग, डिफेन्स कंपनी शेअर्स तेजीत, मिळेल मोठा परतावा - NSE: MAZDOCK Apollo Micro Systems Share Price | झुंबड हा स्टॉक खरेदीला; मल्टिबॅगर शेअरने अप्पर सर्किट हिट केला - NSE: APOLLO
x

Special Recipe | झणझणीत दाल खिचडी बनवा घरच्याघरी - पहा रेसिपी

मुंबई, ३१ जुलै | रोज रोज घरचं जेवण खाऊन कंटाळा आला की हॉटेलला जायचं मन होतं. हॉटेल्सच्या चवीचे पदार्थ तुम्ही घरच्याघरी सुध्दा तयार करू शकता. आज आम्ही अशी रेसिपी सांगणार आहोत, जी सगळ्यांनाच हॉटेल स्टाईलची आवडत असते. चला तर मग जाणून घेऊया कशी तयार करायची घरच्याघरी झणझणीत दाल खिचडी.

साहित्य:
* 50 ग्राम वाटी.. अंदाजे आहे
* 1/2 वाटी मूग डाळ
* 1/2 वाटी तांदूळ
* 1 कांदा
* 1 टोमॅटो
* 2 हिरव्या मिर्ची
* 1/2 टेबलस्पून लाल तिखट
* 1/2 टेबलस्पून गरम मसाला
* 1/4 टेबलस्पून हळद
* 1/4 टेबलस्पून हिंग
* 1/4 टेबलस्पून जिरं
* 1/4 टेबलस्पून मोहरी
* 1/2 टेबलस्पून लसूण क्रश करून
* 1/2 टेबलस्पून आद्रक क्रश करून
* चवीनुसार मीठ

तडका फोडणीसाठी साहित्य:
* 1/4 जिरं
* 2-4 लाल सुख्या मिर्च्या
* 1 टीस्पून कडीपत्ता

संपूर्ण कृती:
१. प्रथम डाळ, तांदूळ साफ करून स्वच्छ धुऊन घेतले. कुक्कर मध्ये घेऊन त्यात हळद, मीठ, थोडी हिंग घालून दोन शिट्या करून घेतले. (हिंग 1/4 टेबलस्पून मधलेच अर्धे घातले बाकीचे फोडणीत घालणार).
२. मसाल्याची तयारी केली. कढईत तेल गरम करून घेतले आणि जिरं, मोहरी, लसूण अद्रक कांदा, मिर्ची घालून घेतले कांदा मऊ झाला की टोमॅटो आणि मसाले पावडर घातले. टोमॅटो मऊ करून घेतला.
३. टोमॅटो मऊ झाले की, कुक्कर ला शिजवून घेतलेले डाळ तांदूळ घातले आणि चांगले मिक्स करून घेतले गरजेनुसार मीठ घातले आणि 2-3 मिनिट शिजवून गॅस बंद केला. फोडणीच्या भांड्यात जिरं, मिर्ची, कडीपत्ता ची फोडणी करून खिचडी वर घातले. झाली आपली मस्त खिचडी. सर्व्ह केली

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Recipe Title: Dal khichdi recipe in Marathi news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या