12 December 2024 9:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Hyderabad Rape Case | 6 वर्षांच्या मुलीवर बलात्कार प्रकरण | रेल्वे ट्रॅकवर सापडला आरोपीचा मृतदेह

Hyderabad Rape Case

अमरावती, १६ सप्टेंबर | तेलंगणामध्ये 6 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार आणि हत्येच्या आरोपीचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर सापडला आहे. पोलिसांनी शरीरावर असलेल्या टॅटूवरून त्याची ओळख पटवली आहे. हा मृतदेह हैदराबादच्या सिंगारेनी कॉलनीतील बलात्कार आणि हत्येचा आरोपी पी राजू (30) याचा असल्याची माहिती तेलंगणाच्या डीजीपीने दिली आहे. आरोपीचा मृतदेह सापडल्याने विरोधक हैदराबाद पोलिस आणि सरकारवर प्रश्न उपस्थित करत आहेत, कारण दोन दिवसांपूर्वी राज्याचे कामगार मंत्री मल्ल रेड्डी म्हणाले होते की, आम्ही आरोपींचे एन्काउंटर करुन मारुन टाकू.

Hyderabad Rape Case, 6 वर्षांच्या मुलीवर बलात्कार, रेल्वे ट्रॅकवर सापडला आरोपीचा मृतदेह – Hyderabad Rape Murder accused found dead 2 days after encounter threat :

मंत्र्याव्यतिरिक्त काँग्रेस खासदाराने एन्काउंटरविषयी केले होते भाष्य:
मल्ला रेड्डी मंगळवारी एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी मेडचल-मलकाजगिरी जिल्ह्यात आले होते. तिथे ते म्हणाले होते की – बलात्काराचा 30 वर्षीय आरोपी निश्चितपणे पकडला जाईल आणि तो एन्काउंटरमध्ये मारला जाईल. त्याला सोडण्याचा प्रश्नच नाही. मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी या खटल्याची सुनावणी जलदगतीने केली जाईल. आम्ही पीडितेच्या कुटुंबाला भेटू. त्यांना मदत करु आणि भरपाई देखील दिली जाईल.

काँग्रेस खासदारानेही एन्काउंटरविषयी सांगितले:
केवळ रेड्डीच नाही, मलकाजगिरि काँग्रेस खासदारही आरोपींच्या एन्काउंटरविषयी बोलले होते. पीडित कुटुंबाला भेटून परतत असताना त्यांनी हे वक्तव्य केले होते.

शेजाऱ्यावरच मुलीच्या बलात्कार आणि हत्येचा आरोप:
9 सप्टेंबर रोजी मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. तिचा मृतदेह एका बंद घरात सापडला होता. या प्रकरणात शेजारी राहणाऱ्या युवकावर आरोप होता. तेलंगणा पोलिसांनी त्याला अटक करण्यासाठी 15 टीम तयार केल्या होत्या आणि या टीम महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशात पाठवण्यात आल्या होत्या. पोलिसांनी या आरोपीबद्दल कोणतीही माहिती देणाऱ्याला 10 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. या भीषण हत्याकांडाच्या निषेधार्थ हैदराबादमध्ये कँडल मार्चही काढण्यात आला होता.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: Hyderabad Rape Murder accused found dead 2 days after encounter threat.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x