18 May 2021 9:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
लोकसभा निवडणूक २०२४ नंतर देशात सत्तांतर निश्चित? | 'मोदी पर्वाच्या' अस्ताची ही असतील कारणं - सविस्तर वृत्त Cyclone Tauktae | मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आदित्य ठाकरे मुंबई महानगरपालिका कंट्रोल रुममध्ये WHO'च्या शास्त्रज्ञाचा इशारा | भारतासाठी कोरोनाचं संकट मोठं, पुढील 6 ते 18 महिने चिंतेचे High Alert | मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील काही तासांत अतिवृष्टीचा इशारा VIDEO | सुवेंदु अधिकारी यांनी माझ्याकडून लाच घेतली होती त्यांचं काय? मॅथ्यू सॅम्युअलचा सवाल देशात वादळ आणि कोरोना आपत्ती | त्यात अमृता फडणवीस यांचं सूचक नव्हे तर 'निरर्थक ट्विट' केंद्राने जगभरात लसी फुकट वाटल्या, त्यांच्या पापाचं फळ जनतेला भोगावं लागतंय - रुपाली चाकणकर
x

अरविंद सावंत यांच्या केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा

Shivsena, MP Arvind Sawant, BJP

नवी दिल्ली: राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा वाढला असून अखेर शिवसेना केंद्रीय मंत्रिमंडळातून बाहेर पडली आहे. शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे राजीनामा सोपविला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात महाशिवआघाडी जवळपास निश्चित झाल्याची चर्चा सुरु झाली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

अरविंद सावंत यांनी त्यांचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुपूर्द केला. यावेळी ते म्हणाले की भारतीय जनता पक्षाने दिलेला शब्द पाळला नाही. राज्यात ५०-५० चा फॉर्म्युला करण्याचे ठरले होते. मात्र भारतीय जनता पक्षाने तसे केले नाही. त्यामुळे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर केंद्रातील मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणूक निकालानंतर दिलेला शब्द पाळलेला नाही. त्यामुळे मी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देतो आहे असं अरविंद सावंत यांनी सांगितलं आहे. या सगळ्या घडामोडींनंतर शिवसेना एनडीएतून बाहेर पडली का? असा प्रश्न सावंत यांना विचारण्यात आला. ज्यावर मी राजीनामा दिला आहे त्यातच सगळं आलं असं सूचक वक्तव्य अरविंद सावंत यांनी केलं. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पाठवलेल्या राजीनाम्याची प्रतही त्यांनी प्रसारमाध्यमांना दाखवली.

हॅशटॅग्स

#Shivsena(1082)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x