29 April 2024 1:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या Jai Balaji Share Price | कुबेर कृपा करतोय हा शेअर! वेळीच खरेदी करा, मागील 1 वर्षात दिला 1700 टक्के परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, स्टॉक तेजीत येतोय, टार्गेट प्राईस जाणून घ्या Penny Stocks | एक वडापावच्या किमतीत 16 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत करतील श्रीमंत PSU Stocks | हा PSU शेअर बंपर तेजीत वाढणार, 2 महिन्यात होईल मोठी कमाई, काय म्हटलं तज्ज्ञांनी? IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर्स 30 दिवसात मोठी परतावा देणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर IREDA Share Price | IREDA शेअर्स खरेदीसाठी गुंतवणूकदार तुटून पडले, कंपनीबाबत लेटेस्ट अपडेट, फायदा घेणार?
x

'आयुष्मान'कार्ड परत देत... मोदींकडेच उपचाराला जा! डॉक्टरचा सल्ला

लखनऊ : मोदींच्या महत्काकांक्षी योजनेचा देशभरात पूर्ण फज्जा उडण्यास सुरुवात झाली आहे. कारण लखनऊ मधील किंग जॉर्ज वैद्यकीय विद्यापीठाच्या डॉक्टरनी केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत योजनेतून संबंधित रुग्नांवर उपचार करण्यास स्पष्ट नकार देत त्यांना कार्ड परत हातात देऊन मोदींकडेच उपचाराला जा, असा थेट सल्ला दिल्याचा आरोप संबंधीत रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. तसे अधिकृत वृत्त एएनआय’ने दिले आहे.

मोदींच्या हस्ते नुकतीच देशातील १० कोटी गरीब, गरजू कुटुंबांना आयुष्मान भारत या आरोग्य विमा योजनेद्वारे ५ लाखांचा विमा पुरविला आहे. यासाठी सरकारी आणि ट्रस्टच्या हॉस्पिटलनाही यामध्ये सहभागी करून घेण्यात आले आहे. तसेच मोदींनी या योजनेचा थेट जगातील सर्वाधिक मोठी आरोग्य योजना असल्याचा गाजावाजा केला खरा, परंतु त्याचा पुरता फज्जा उडत असल्याची अनेक उदाहरणं समोर आली होती आणि अजून सुद्धा येत आहेत. त्यातीलच अजून एक प्रकार लखनऊच्या किंग जॉर्ज वैद्यकीय हॉस्पिटलमध्ये घडला असून या योजनेत डॉक्टरांना आणि इस्पितळांना सुद्धा रस नसल्याचे समोर येत आहे.

सोमवारी रात्री लखनऊमधील किंग जॉर्ज वैद्यकीय विद्यापीठाच्या हॉस्पिटलमध्ये रुग्णाला घेऊन त्याचे नातेवाईक आले होते. दरम्यान, त्यांनी आयुष्मान योजनेचे कुटुंबाला केंद्र सरकारकडून मिळालेले अधिकृत कार्ड दाखविले. परंतु, संबंधित डॉक्टरने हे कार्ड पुन्हा हातात ठेवत उपचार करण्यास स्पष्ट नकार दिला. तसेच हे कार्ड तुम्ही घ्या आणि मोदींकडेच जा, असा अजब सल्ला सुद्धा रुग्णाच्या नातेवाईकांना सर्वांदेखत दिला. याबाबतची तक्रार नातेवाईकांनी केल्यानंतर विद्यापिठाच्या प्रवक्त्याने संबंधित डॉक्टरवर लवकरच कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याचे वृत्त आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x