1 May 2024 7:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 01 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 01 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या PSU Stocks | या PSU शेअरने अल्पावधीत दिला 200% परतावा! कंपनीबाबत सकारात्मक अपडेटने शेअर्स खरेदीसाठी गर्दी Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, झटपट 22 टक्केपर्यंत परतावा मिळेल REC Share Price | कमाईची संधी! 1 वर्षात 265% परतावा देणारा शेअर काही दिवसात देईल मोठा परतावा BHEL Share Price | मल्टिबॅगर PSU BHEL शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर NBCC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 265% परतावा, स्टॉक चार्ट काय संकेत देतोय?
x

राफेल'डील भ्रष्टाचाराची सीबीआय चौकशी पूर्ण होऊ नये, म्हणून CBI मध्ये हालचाली? प्रशांत भूषण

नवी दिल्ली : राफेल लढाऊ विमानांच्या डीलमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी CBI कडे यापूर्वीच करण्यात आली होती. दरम्यान, नेमकी तीच चौकशी पूर्ण होऊ नये, म्हणूनच CBI मध्ये सध्या जोरदार हालचाली घडवल्या जात आहेत असा गंभीर आरोप ज्येष्ठ विधी तज्ज्ञ प्रशांत भूषण यांनी केला आहे. तसेच महत्वाचं म्हणजे CBI संचालक आलोक वर्मा यांना त्यांच्या पदावरुन हटवण्याची कारवाई म्हणजे याच हालचालींचा मुख्य भाग असल्याचा दावा सुद्धा प्रशांत भूषण यांनी केंद्र सरकारवर केला आहे. दरम्यान, वादग्रस्त अधिकारी राकेश अस्थाना यांना वाचवण्यासाठी मोदी सरकारचा सर्व खटाटोप सुरू आहे, असं थेट विधान सुद्धा त्यांनी केल्याने एकच खळबळ माजली आहे.

काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा राफेल करारासंबंधित माहिती सील बंद लिफाफ्यातून न्यायालयाला द्यावी असे थेट आदेश दिले होते. दरम्यान, या प्रकरणात मोदी सरकारच्या अडचणी वाढल्याने सीबीआयचं महानाट्य सुरु झाल्याचा थेट आरोप ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी केला आहे. CBI मधील २ मोठ्या अधिकाऱ्यांना मोदी सरकारनं आज सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा तडकाफडकी निर्णय घेतला आहे. त्यात सीबीआयचे संचालक आलोक वर्मा आणि सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांचा दोघांचा समावेश आहे.

दरम्यान , या दोघांपैकी आलोक वर्मा यांना अत्यंत चुकीच्या पद्धतीनं पदावरुन दूर केल्याचा गंभीर आरोप प्रशांत भूषण यांनी मोदी सरकारवर केला आहे. तसेच CBI च्या राकेश अस्थाना या वादग्रस्त अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारचे जोरदार प्रयत्न सुरू असून या सर्व हालचालींविरोधात विरोधात आपण सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं भूषण यांनी स्पष्ट केलं आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x