17 April 2021 12:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
कडक संचारबंदीत लोक शिवथाळी खायला जाणार कसे? | पण शिवथाळीसाठी गर्दी | राम कदम तोंडघशी Alert | हवेतून वेगाने पसरतो कोरोना, 3 देशांतील तज्ञांना याचा ठोस पुरावा सापडला - लँसेट जर्नल १९-२० एप्रिल नंतर रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होईल - डॉ. राजेंद्र शिंगणे Alert | एकूण रुग्णांपैकी 10% रुग्ण 11 ते 19 वयोगटातील तर 4.42% रुग्ण 10 वर्षांपेक्षा कमी वयाचे केंद्राची कोविड रणनीती, पहिला टप्पा लॉकडाउन, दुसरा टप्पा घंटी वाजवणे, तिसरा टप्पा देवाचे गुण गा प्रेतं जळत होती तेव्हा साहेब निवडणुकीत 'जुमलेबाजी' करत होते... इतिहास साक्ष देईल - काँग्रेस महाराष्ट्र एकीकरण समितीविरोधात प्रचार करून भाजप मराठी भाषिकांसोबत नाही हे सिद्ध झाले आहे
x

YouTube आणि Tik-Tok चा मुख्यमंत्री करून टाका त्याला: निलेश राणे

Shivsena MP Nilesh Rane, Aaditya Thackeray, Former MP Nilesh Rane

मुंबई : राज्यात सत्तास्थापनेवरून भाजप आणि शिवसेनेतील वाद आता चिघळला आहे . लोकसभेपूर्वी ठरलेल्या फॉर्म्युलानुसार मुख्यमंत्रीपदासह सत्तेच समसमान वाटप व्हावं, या मागणीवर ठाम राहिलेल्या शिवसेनेनं अखेर एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी वेळेवेळी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. आता राऊतांवर आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विटवरुन जोरदार टीका केला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

दरम्यान, केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अरविंद सावंत यांनी आदित्य ठाकरे यांच्याबाबत प्रसार माध्यमांना एक प्रतिक्रिया दिली त्याला अनुसरून माजी खासदार निलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्या बाबतीत एक ट्विट करत शिवसेनेला टोला लगावला आहे. त्यात निलेश राणे यांनी म्हटलं आहे, ‘YouTube आणि tik tok चा मुख्यमंत्री करून टाका त्याला. त्याची खरी स्पर्धा Dhinchak पूजा सोबतच झाली पाहिजे. Youtube वर अनेक नवीन रोड’वरच्या कलाकारांकडे खूप potential आहे. स्पर्धा चांगली रंगेल.’

शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करण्याच्या तयारीत असून यावरुन सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. रोज पत्रकार परिषद घेऊन भाजपावर टीका करत असल्याने संजय राऊत यांचं नाव सध्या चर्चेत आहे. दरम्यान माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली असून येणाऱ्या दिवसात शिवसैनिकच त्यांना चोपेल असा टोला लगावला आहे.

संजय राऊत इतके गरीब आहे की मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद बघायला पवार साहेबांच्या घरी गेले. बाकीचं राहु द्या, अगोदर त्यांना कुणीतरी TV आणि लाईट बिलचे पैसे द्या, अशी टीका त्यांनी दोन दिवसांपूर्वी राऊत यांच्यावर केली होती. राणे कुटुंबाचा आणि ठाकरेंमधला वाद सर्वांना ठाऊक आहे. त्यातच आता राज्यात सत्तास्थापनेवरून संघर्ष सुरू आहे. अशातच निलेश राणेंनी संजय राऊतांना छेडलंय. त्यामुळे शिवसेनेकडून निलेश राणेंच्या टीकेला काय उत्तर दिलं जातं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाह यांच्याशी चर्चा झाली होती आणि त्यात त्यांनी अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याबाबच आश्वासन दिले होते, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी केलेला दावा खोडून काढला. भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी युतीबाबत चर्चा करताना आम्हाला उपमुख्यमंत्रिपद देऊ असे सांगितले होते. युतीबाबतची चर्चा एकदा फिस्कटल्यानंतर अमित शाहांचा मला फोन आला होता. त्यावेळी त्यांनी उद्धवजी तुम्हाला काय पाहिजे अशी विचारणा केली. तेव्हा मी सांगितले की मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री सत्तेवर आणेन असे वचन दिले असल्याचे देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

हॅशटॅग्स

#Aditya Thakarey(103)#Nilesh Rane(59)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x