12 May 2024 1:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 12 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 12 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांनी टाटा पॉवर शेअर्सची रेटिंग घटवली, स्टॉक प्राईसवर मोठा परिणाम होणार Servotech Share Price | मल्टिबॅगर सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स शेअर्समध्ये घसरण वाढतेय, स्टॉक Hold करावा की Sell? Penny Stocks | चिल्लर प्राईस 10 पेनी शेअर्स खरेदी करा, किंमत 1 रुपया ते 7 रुपये, मोठी कमाई होईल GMP IPO | पहिल्याच दिवशी मालामाल करणारा IPO लाँच होतोय, ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, खरेदी करणार? Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत मोठी अपडेट आली, शेअर्सला किती फायदा होणार?
x

Special Recipe | झणझणीत कोळंबी भात पाककृती बनवा घरच्याघरी | नक्की ट्राय करा

Kolambi rice recipe in Marathi

मुंबई ०५ ऑगस्ट : पावसाळ्यात काहीतरी झणझणीत खाण्याची आपली अनेकदा इच्छा होतं असते. त्यातही आपण घरच्याघरी बनविण्यासाठी एखादा नॉनव्हेग पदार्थ निवडल्यास बातच वेगळी म्हणावी लागेल. चला तर आज आम्ही तुम्हाला कोळंबी भात घरी कसा बनवायचा हे सांगणार आहोत;

साहित्य :
* 1/4 किलो कोळंबी
* 2 वाटया बासमती तांदूळ
* 2 मध्यम बटाटे
* 2 टेबलस्पून आले लसूण पेस्ट
* 1 कांदा
* 1 टोमॅटो
* 2 हिरव्या मिरच्या आणि’
* मूठभर कोथंबीर व पुदिन्याची पाने एकत्रित पेस्ट
* 1 टेबलस्पून गरम मसाला पावडर
* 4-5 काळीमिरी
* 4 लवंगा
* ½ इंच दालचिनी तुकडा
* 1 हिरवी वेलची
* 1 चक्रीफूल
* 1 तमालपत्र यांची एकत्रित पावडर
* 1 टीस्पून हळद
* 1 टेबलस्पून बिर्याणी मसाला
* 1 टीस्पून लाल तिखट
* 1/2 लिंबाचा रस

फोडणीसाठी:
* 2-3 तमालपत्र
* तेल

कृती:
१. कोळंबीतील धागे काढून स्वच्छ धुऊन घ्यावी. कांदा उभा पातळ चिरून घ्यावा, टोमॅटो बारीक चिरावा, बटाट्याच्या साली काढून उभ्या फोडी करून घ्याव्यात. चवीनुसार मीठ मिरच्यांना उभ्या चीरा देऊन फोडणीचे साहित्य तयार ठेवावे. तांदूळ स्वच्छ धुऊन घ्यावेत.

२. गॅसवर कूकर ठेवून त्यात तेल गरम करावे. प्रथम तमालपत्र फोडणीला घालावे, कांदा हलकासा ब्राऊन रंगावर परतावा, त्यानंतर टोमॅटो घालावा. टोमॅटो मऊ झाल्यावर वर सांगितल्याप्रमाणे दोन्ही पेस्ट, गरम मसाला पावडर, बिर्याणी मसाला व इत्तर साहित्य छान परतावे.

३. सर्व साहित्य परतून झाल्यावर त्यात कोळंबी व बटाटे परतावे. कडेने तेल सुटू लागले की तांदूळ परतावे. लिंबाचा रस घालावा. त्यानंतर त्यात तांदळाच्या दुप्पट गरम पाणी घालावे. चवीनुसार मीठ घालून कुकरचे झाकण लावून मध्यम आचेवर कूकरच्या दोन शिट्या होऊ द्याव्यात. झाला कोळंबी भात तयार.वरून कोथिंबीर घालून मस्त सर्व्ह करा.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Kolambi rice recipe in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x