20 May 2024 3:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं
x

Special Recipe | नाश्त्याला बनवा स्पायसी चिकन सामोसा - पहा रेसिपी

Chicken Samosa recipe in Marathi

मुंबई ५ ऑगस्ट | सकाळच्या नाश्त्याला आपण अनेक पदार्थ बनवत असतो. परंतु अनेकदा त्यात तोचतोच पणा असल्याने त्या पदार्थांची मजा घेता येतं नाही. पण रोजच्या पेक्षा काही वेगळं असेल तर मग घरातील प्रत्येकजण त्या पदार्थावर तुटून पडलाच म्हणून समजा. आज तसाच एक पदार्थ म्हणजे चिकन सामोसा घरच्याघरी कसा बनवायचा ते आम्ही या रेसिपीतून पाहणार आहोत. चला तर पाहूया चिकन सामोसा कसा बनवायचा ते;

साहित्य :
* पारी साठी साहित्य
* 1 कप मैदा
* 2 टेबलस्पून तेल किंवा तूप
* 1 टीस्पून ओवा
* चवीप्रमाणे मीठ
* पाणी
* चिकन खिमा साठी साहित्य
* 1 कप बोनलेस चिकन तुकडे
* 2 मध्यम आकाराचे कांदे
* 6-7 लसूण पाकळ्या
* 1 इंच आलं
* थोडी कोथिंबीर
* 1 टेबलस्पून कांदा लसूण मसाला
* 1 टीस्पून लाल तिखट. कांदा लसूण मसाला नसेल तर लाल तिखट जास्त घेणे
* 1/4 टीस्पून हळद
* 1 टीस्पून गरम मसाला
* 1 टीस्पून ऐव्हरेस्ट चिकन मसाला
* चवीप्रमाणे मीठ
* 2-3 टेबलस्पून तेल
* तळण्यासाठी तेल

कृती :
१. एका वाटी मध्ये मैदा, मीठ,ओवा हातावर चोळून घालावा.तेल घालून मैदयाला चोळून घ्यावे. थोडे,थोडे पाणी घालून घट्ट मळून घेणे. तेलाचा हात लावून चांगले मळून घेणे व झाकून ठेवावे.

२. चिकनचे तुकडे स्वच्छ करून व धुवून घेणे.मिक्सरमधुन खिमा करून घेणे.खिमा करताना कोथिंबीर घालावी. आलं व लसूण किसून घेणे किंवा ठेचून घेणे.कांदा बारीक चिरून घ्यावा.

३. गॅसवर पॅन गरम करत ठेवावा. त्यात तेल टाकावे. तेल तापले की, कांदा घालून गुलाबी होईपर्यंत परतावा. नंतर सर्व मसाले घालून परतणे. 5-6 मिनिटे लागतात.

४. खिमा व मीठ घालून मिक्स करून घेणे. पाणी घालायचे नाही. मीठ व चिकन चे पाणी सुटते. झाकण ठेवून शिजवून घेणे. अधूनमधून हलवून घेणे. 8-10 मिनिटे लागतात. चिकन शिजले की गॅस बंद करावा. चिकन मसाला घालून मिक्स करून घेणे.

५. पीठ पुन्हा मळून घेणे व त्याचे समान तातभाग करून घ्यावेत. एक लाटी लंबगोल लाटून घेणे. सुरीने दोन भाग करून घेणे.एका भागाचा कोन करून घेणे. त्यात चिकन खिमा भरून घेणे.

६. वरच्या बाजूला पाणी लावून घेणे. दोन्ही तोंडे दाबून बंद करून घेणे. अशाप्रकारे सर्व समोसे करून घेणे.

७. गॅसवर कढई तापत ठेवून त्यात तेल घालणे. तेल तापले की, गॅस मंद आचेवर ठेवून, तयार समोसे घालून सोनेरी रंगावर तळून घ्यावेत. दोन्ही बाजूंनी हलवत राहावे. 7-8 मिनिटे तळण्यासाठी लागतात. हे समोसे हिरवी चटणी, शेजवान चटणी किंवा टोमॅटो सॉस सोबत खाऊ शकता.

News Title: Chicken Samosa recipe in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x