नवी दिल्ली, ०६ ऑगस्ट | टोकियो ऑलिम्पिक सुरु झाल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःचा जोरदार पीआर सुरु केल्याची चर्चा आता समाज माध्यमांवर रंगू लागली आहे. विशेष म्हणजे २०२१ मधील केंद्रीय बजेटमध्ये मोदी सरकारने यावर्षी ऑलिम्पिक स्पर्धा असतानाही तब्बल 230 कोटी 78 लाख रुपयांची म्हणजे स्पोर्ट्स वार्षिक बजेट रक्कम तब्बल 8.16 टक्क्यांनी घटवली आहे. त्यावरून खेळ आणि ऑलिम्पिक स्पर्धा याविषयावर किती गंभीर आहेत याचा प्रत्यय येतो. मात्र स्पर्धा सुरु झाल्यापासून त्यांनी स्वतःच्या संवादाचे व्हिडिओ कंटेंट प्रसार माध्यमांकडे पोहोचवून स्वतःचा जोरदार PR केल्याची चर्चा सुरु झाली आहे.
संसदेच्या चर्चेत सहभागी न होणारे मोदी कार्यालयीत खेळाडूंच्या व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये व्यस्त असल्याचं मागील काही दिवसांपासून पाहायला मिळतंय. मुळात तो ऑडिओ काल असताना मोदींच्या कार्यालयातील आणि टोकियोतील स्पर्धकांमध्ये एक टीम याच PR साठी काम करत असल्याचं म्हटलं जातंय. अगदी आजच उदाहरण म्हणजे मोदींनी भारतीय महिला हॉकी संघाच्या खेळाडूंशी फोनवरुन बातचित केली. पंतप्रधानांचे कौतुकाचे बोल ऐकून महिला हॉकीपटूंचे डोळे पाणावले. पंतप्रधानांनी खेळाडूंना प्रोत्साहन देत त्यांच्या खिलाडू वृत्तीची तारीफ केली. फोनवरील संवादावेळी महिला हॉकीपटूंचे भाव कॅमेरात कैद झाले आहेत. आणि तेच कन्टेन्ट माध्यमांमध्ये पोहोचविण्यात येत आहेत.
याच विषयाला अनुसरून काँग्रेसने मोदींवर जोरदार टीका केली आहे. यावेळी सुरजेवाला यांनी आरोप केला, की ”ओलिम्पिक वर्षात खेळावरील बजेट कमी करण्यात आले आणि आता नरेंद्र मोदी लक्ष भरकटवण्याचे काम करत आहेत. ते कधी शेतकऱ्यांच्या समस्येवरून, कधी हेरगिरी प्रकरणावरून तर कधी महागाईच्या मुद्द्यावरून लक्ष भरकटवत आहेत.”
राजीव गांधी, हे देशाचे नायक आहेत. ते पुरस्कारासाठी नव्हे, तर त्यांच्या होतात्म्यासाठी, विचारांसाठी आणि आधुनिक भारताच्या निर्मितीसाठी ओळखले जातात. राजीव गांधी या देशासाठी नायक होते, आहेत आणि राहतील. याच बरोबर, हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रति व्यक्त करण्यात आलेल्या सन्मानाचे काँग्रेस स्वागत करते. मात्र, नरेंद्र मोदीजींनी क्षुल्लक राजकीय हेतूंसाठी त्यांचे नाव ओढले नसते तर बरे झाले असते. तथापि, आम्ही खेल रत्न पुरस्काराला मेजर ध्यानचंद यांचे नाव देण्याच्या निर्णयाचे स्वागत करतो,” असेही सुरजेवाला म्हणाले.
काँग्रेसने म्हटले आहे, की “आता आम्हाला आशा आहे की, देशातील खेळाडूंच्या नावावरच आणखी स्टेडियम आणि योजनांची नावेही ठेवली जातील. सर्वप्रथम नरेंद्र मोदी स्टेडियमचे नाव बदला, अरुण जेटली स्टेडियमचे नाव बदला. भाजप नेत्यांच्या नावाने तयार करण्यात आलेल्या स्टेडियम्सची नावं बदला. आता स्टेडियमचे नाव पीटी उषा, मिल्खा सिंग, सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, अभिनव बिंद्रा, लिएंडर पेस, पुलेला गोपीचंद आणि सानिया मिर्झा यांच्या नावावर ठेवा.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Congress demanded to rename Narendra Modi and Arun Jaitley stadium news updates.
 
						 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		