6 May 2024 12:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

मोफत LPG गॅस कनेक्शन | कनेक्शनसाठी पत्त्याचा पुरावा गरजेचा नाही | असा करा ऑनलाईन अर्ज

Apply for Ujjwala Yojana free gas cylinder

नवी दिल्ली, १० ऑगस्ट | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी व्हिडिओ काँफ्रन्सिंगच्या माध्मयातून उज्ज्वला 2.0 योजनेचे उद्घाटन केले. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 1 कोटी महिलांना मोफत कनेक्शन देण्यासाठी विशेष फंड देखील जारी करण्यात आला आहे. सुरुवातीला उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात असलेल्या एक हजार महिलांना नवीन मोफत LPG कनेक्शन देण्यात आले. या कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांतच्यासह उपमुख्यमंत्र्यांनी डिजिटल उपस्थिती नोंदवली.

यावेळी सरकारकडून या योजनेत मोफत LPG कनेक्शनसोबत भरलेले गॅस सिलेंडर सुद्धा मोफत दिले जात आहे. सोबतच, ज्या आर्थिक मागास घटकांना यापूर्वीच्या उज्ज्वला योजनेत कनेक्शन मिळाले नाहीत. त्यांना या योजनेमध्ये कनेक्शन दिले जाणार असे सांगण्यात आले आहे.

पत्त्याचा पुरावा आवश्यक नाही:
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या योजनेचे लोकार्पण केले. तसेच आता उज्ज्वला 2.0 चा लाभ घेण्यासाठी भारतीयांना शिधापत्रिका आणि पत्त्याचा दाखला जमा करण्याची आवश्यकता नाही. गरजवंतांना स्वतः एक डिक्लेरेशन (लेखी शपथपत्र) देऊन योजनेचा लाभ घेता येईल.

3 कोटी गरिबांना वीज कनेक्शन:
या कार्यक्रमानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इतर योजनांतील लाभार्थ्यांची आकडेवारी जारी केली. त्यानुसार, पंतप्रधान आवास योजनेत 2 कोटींपेक्षा अधिक लोकांना पक्की घरे बांधता आली. या घरांवर प्रामुख्याने महिलांची मालकी आहे. तर सौभाग्य योजनेच्या माध्यमातून जवळपास 3 कोटी गरीब कुटुंबांच्या घरात वीज कनेक्शन देण्यात आले असे पंतप्रधानांनी सांगितले.

उज्जवला योजनेची अशी आहे पात्रता:
अर्ज करणारी व्यक्ती महिला असावी
महिलेचे वय 18 वर्षांपेक्षा अधिक असावे
महिला BPL कुटुंबातून असायला हवी
महिलेकडे BPL कार्ड आणि शिधापत्रिकाअसावे
अर्ज करणारी महिला किंवा तिच्या कुटुंबातील एकही सदस्याच्या नावे LPG कनेक्शन असू नये
असे करता येईल अर्ज

योजनेचा लाभ घेण्यासाठी:
* तुम्हाला pmuy.gov.in/ujjwala2.html या वेबसाइटला भेट द्यावी लागेल
* या ठिकाणी एक डाउनलोड फॉर्मचा पर्याय दिसेल
* फॉर्म डाउनलोड केल्यानंतर त्यातील आवश्यक माहिती भरावी
* हा फॉर्म आता तुम्हाला एलपीजी केंद्रावर जमा करावा लागेल
* यासाठी लागणारी इतर आवश्यक कागदपत्रे सोबत जमा करावीत
* यानंतर कागदांची पडताळणी होईल आणि कनेक्शन मिळेल

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: How to apply for Ujjwala Yojana free gas cylinder online in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#SarkariYojana(112)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x