16 May 2024 4:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Andhra Paper Share Price | स्टॉक स्प्लिट आणि आणि डिव्हीडंड वाटपाची घोषणा, अल्पावधीत मजबूत फायदा करून घ्या Praj Industries Share Price | अशी संधी सोडू नका! फटाफट 50% परतावा मिळेल, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला Triveni Turbine Share Price | 97 रुपयाच्या शेअरची कमाल! 3 वर्षात 470% परतावा दिला, शेअर अप्पर सर्किट हिट करतोय RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेल्वे स्टॉक बुलेट ट्रेनच्या वेगाने परतावा देणार HAL Share Price | PSU स्टॉक HAL सुसाट तेजीत परतावा देणार, परतावा पाहून खरेदीला ऑनलाईन गर्दी Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 16 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांकडून टाटा पॉवर शेअर्ससाठी 'बाय' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस केली जाहीर
x

तुम्ही उभ्या देशात नियम फाट्यावर मारता, ते धंदे आम्हाला इथे शिकवू नका | शेलारांना झापलं

Shivsena leader Yashwant Jadhav

मुंबई, १४ ऑगस्ट | भाजप आमदार आशिष शेलार कायम शिवसेनेवर कायम निशाणा ठेऊन असतात. मुंबई महापालिकेत कार्यरत असलेल्या मराठी अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीवरून वादाची ठिणगी पडली आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीवरून शिवसेनेवर बाण डागल्यानंतर शिवसेनेकडून पलटवार करण्यात आला आहे. शिवसेनेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी शेलारांना नागरिकशास्त्र वाचण्याचा सल्ला देत टोला लगावला आहे.

आमदार आहात, किमान नागरिकशास्त्र वाचा:
यशवंत जाधव यांनी त्यांच्या ट्विटर वरून आशिष शेलारांना प्रत्युत्तर दिलं आहे. “आमदार आहात. किमान नागरिकशास्त्र वाचा. मुंबई महानगरपालिका कायदे आणि नियमानेच चालते. तुम्ही उभ्या देशात नियम फाट्यावर मारता, ते धंदे आम्हाला इथे शिकवू नका. तुम्ही काय काय घाण केली, तुमचे “बगलबच्चे” कोण, हे आम्हाला माहिती आहे. मराठीचे ढोंग करून त्यांची वकिली करू नका”, अशा शब्दात यशवंत जाधव यांनी शेलारांवर टीकास्त्र डागलं आहे.

“पालिकेच्या प्रत्येक विभागाची आणि तेथील कर्मचाऱ्यांची आम्हाला काळजी आहे. तुम्ही चिंता करण्याची गरज नाही. त्या-त्या विभागातल्या बढत्या नियमानुसार वेळच्या वेळी करण्यात आल्या आहेत. यापुढेही होतील. मनाला वाटले आणि निर्णय घेतले, असे करायला पालिका म्हणजे तुमच्या “पाळीव यंत्रणा” नाही”, असा चिमटा जाधव यांनी शेलारांना काढला.

आम्ही कायद्याच्या चौकटीत असेल तेच करू आणि जनतेच्या हिताचेच निर्णय घेऊ. पालिकेतील तुमचा अवतार संपला आहे. आणि उरलेला सहा महिन्यांत संपणार आहे. त्यामुळे तुमच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही. पालिकेतील कामकाज कायद्यानुसार कसे चालते, त्याची माहिती वेळ काढून तुमच्याच नगरसेवकांकडून घ्या”, असं जाधव यांनी म्हटलं आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Shivsena leader Yashwant Jadhav replies to BJP MLA Ashish Shelar news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x