29 April 2024 4:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार? IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, अशी संधी सोडू नका Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या Jai Balaji Share Price | कुबेर कृपा करतोय हा शेअर! वेळीच खरेदी करा, मागील 1 वर्षात दिला 1700 टक्के परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, स्टॉक तेजीत येतोय, टार्गेट प्राईस जाणून घ्या Penny Stocks | एक वडापावच्या किमतीत 16 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत करतील श्रीमंत
x

राज्यातील सामाजिक सांस्कृतिक स्वास्थ्य बिघडवण्यासाठी नागपूर-गुजरातमधून राज ठाकरेंना पुढे केले जातंय - संभाजी ब्रिगेड

Raj Thackeray

सोलापूर, १८ ऑगस्ट | महाराष्ट्रामध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून केला जात असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते हर्षल बागल यांनी केला आहे. महाराष्ट्राचे सामाजिक सांस्कृतिक स्वास्थ्य बिघडवण्यासाठी नागपूर आणि गुजरातमधून राज ठाकरे यांना पुढे केले जात आहे, असा धक्कादायक आरोप यावेळी करण्यात आला.

आगामी निवडणुकीत भाजपशी युती करण्यासाठी राज ठाकरे यांच्याकडून हा प्रयत्न केला जात आहे. पण राज ठाकरे यांनी ठरवलं पाहिजे की इतिहासावर बोलत असताना आपण अभ्यास करून बोललं पाहिजे. त्यामुळे ते बाबासाहेब पुरंदरे यांचे नातू आहेत की प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचे नातू आहेत? असा सवाल देखील संभाजी ब्रिगेड प्रवक्ते हर्षल बागल यांनी केला आहे.

संभाजी ब्रिगेडचा राज ठाकरेंना प्रश्न’प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांनी पूर्ण महाराष्ट्राचे प्रबोधन त्यांच्या साहित्यातून केले. त्यांनी त्यांच्या रंगो बापुची नावाच्या 40 पानांच्या पुस्तकात पुरंदरे यांची सर्व चलाखी उघड केली आहे. ते पुरंदरेच्या लेखनाला भटी लिखाण म्हणतात. बाळासाहेब ठाकरे यांनी देखील हे कसले शाहीर? हा तर सोंगाड्या आहे, असे विधान केले होते. जेम्स लेनच्या नावाखाली जिजाऊंची व शिवरायांची बदनामी करणारे हेच ते पुरंदरे आहेत. पंढरपूरला अमरजित पाटील यांच्याकडे शिवाजी महाराजांचे रामदास स्वामी गुरू नाहीत, हे लेखी देऊन माफी मागावी लागली होती. जेम्स लेन समर्थक बहुलकरांच्या तोडांला पुण्यात शिवसेना पदाधिकारी व शिवप्रेमींनी काळे फासले होते. त्यांना माफी मागायला राज ठाकरे यांनी भाग पाडले होते. त्यामुळे आपण प्रबोधनकरांचे नातू आहात की पुरंदरेंचे? ते आधी एकदा स्पष्ट करावे’, असा सवाल हर्षल बागल यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

पुरंदरेंचा ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ महाविकास आघाडी सरकारने परत घ्यावा:
संभाजी ब्रिगेड’तत्कालिन फडणवीस सरकारने पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला. त्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराला देशभरातील साहित्यीक अभ्यासक, दोन्ही छत्रपती तसेच प्रत्येक क्षेत्रातील लोकांनी, शिवप्रेमींनी, अनेक संघटनांनी विरोध केला. तरीही खुर्चीचा व सत्तेच्या बळाचा वापर करत पुरस्कार दिला गेला व त्या पुरस्काराची किमंत कमी केली. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने पुरंदरेंचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार परत घ्यावा’, अशीही मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Sambhaji Brigade made serious allegations on MNS Chief Raj Thackeray news updates.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x