11 December 2024 2:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | वेदांता शेअरने विक्रमी उच्चांक गाठला, पुढे रॉकेट तेजी, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल IPO GMP | आला रे आला IPO आला, गुंतवणुकीची मोठी संधी, पहिल्याच दिवशी मिळेल मोठा परतावा - GMP IPO 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, जानेवारी 2025 मध्ये महागाई भत्ता इतका वाढणार, अपडेट आली Shukra Rashi Parivartan | डिसेंबरच्या 'या' तारखेपासून शुक्र गोचरमुळे काही राशींना भोगावे लागू शकतात गंभीर परिणाम
x

भाजपची सत्ता नसताना दुसऱ्याच्या घराबाहेर राजकीय हनुमान चालीसा | भाजपाची सत्ता आल्यावर घरात बाप्पासमोर ट्विंकल-ट्विंकल लिटिल स्टार

Viral Video

MP Navneet Rana | काल देशभरात गणेश चतुर्थी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.बाप्पाच्या आगमनाने वातावरण अगदी मंगलमय बनलं आहे. या सणाची धूम सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंतही पाहायला मिळत आहे. इतकंच नव्हे तर विविध रुपात बाप्पाच्या आकर्षक मूर्ती सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत.

दरम्यान, उद्धव ठाकरे त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे तसंच मुलं आदित्य आणि तेजस या सगळ्यांनी काल लालबागचा राजा गणेश मंडळाचा मंडप गाठला. या मंडपात येऊन त्यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आणि मनोभावे प्रार्थना केली. यंदा कोरोनाचं संकट टळल्यानंतर दोन वर्षांनी उत्साहात गणेश उत्सव साजरा केला जातो आहे. अशात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब येऊन लालबाग राजा गणपतीचं दर्शन घेतलं.

महाराष्ट्रात दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. येथे गणेश चतुर्थीची जबरदस्त धूम पाहायला मिळते. येथे लोक तो मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात बाप्पाला आपल्या घरी विराजमान करतात. सर्वसामान्य लोकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत, सर्वजण बाप्पाची मूर्ती घरी आणतात आणि 3 दिवस किंवा आठवडाभर बाप्पाची आराधना करतात.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी राज्यात भाजपाची सत्ता नसल्याने अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी मुंबईत येऊन हनुमान चाळीसा पठणांच्या नावाने मोठा राजकीय ड्रामा केल्याचं संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आहे. आता राज्यात भाजपाची सत्ता आली आहे त्यानंतर खासदार नवनीत राणा यांच्यामधील सर्व खरं आध्यात्म पुढे येऊ लागलं आहे. भाजप सत्ता नसताना दुसऱ्याच्या घराबाहेर राजकीय हनुमान चालीसा पठण करणाऱ्या नवनीत राणा सध्या भाजपाची सत्ता आल्यावर स्वतःच्या घरात बाप्पासमोर ट्विकल-ट्विकल लिटिल स्टारचं पठण करत आहेत. अगदी गणपती बाप्पाची स्वतःहून आरती येतं नसेल तर किमान हनुमान चालीसा पठण केलं तरी चालेल असं नेटिझन्स सूनवत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral Video of MP Navneet Rana Even No Hanuman Chalisa after BJP Govt Twinkal Twinkle little star song trending video 01 September 2022.

हॅशटॅग्स

#Viral Video(163)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x