7 May 2025 12:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये, मिळेल 28 टक्के परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATATECH Vedanta Share Price | बिनधास्त खरा करा हा शेअर, मिळेल दमदार परतावा, यापूर्वी दिला 1063% परतावा - NSE: VEDL Rattan Power Share Price | पेनी स्टॉक 52 आठवड्यांच्या जवळ आला, तज्ज्ञांने दिले महत्वाचे संकेत - NSE: RTNPOWER Horoscope Today | 07 मे 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 07 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | 30 टक्के परतावा देईल टाटा पॉवर स्टॉक, स्वस्तात मिळतोय, संधी सोडू नका - NSE: TATAPOWER
x

IT Return eFilling | 'या' 4 वेबसाइट्सद्वारे फ्री ITR फाईल करू शकता - वाचा सविस्तर

File income tax return

नवी दिल्ली, २३ ऑगस्ट | जर तुम्हाला टॅक्स रिटर्न फाईल करायचे असेल, तर ती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची बातमी आहे. इनकम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी काही वेबसाइट्स आहेत, त्याद्वारे तुम्ही मोफत टॅक्स रिटर्न फाइल करू शकता. आयकर विभागाने रिटर्न ई-फायलिंगसाठी एक पोर्टल तयार केले आहे, ज्याद्वारे तुम्ही टॅक्स रिटर्न फाईल करू शकता. याशिवाय, काही खासगी संस्था त्यांच्या वेबसाइट्सद्वारे मोफत ई-फायलिंग करण्याची सुविधा देत आहेत.

‘या’ 4 वेबसाइट्सद्वारे फ्री ITR फाईल करू शकता (How to file income tax return free of cost in Marathi) :

IT Return Filling On ‘ClearTax’ :
क्लिअरटॅक्स करदात्यांना आयकर वेबसाइटवर लॉग इन न करता थेट आयटीआर दाखल करण्याची परवानगी देते. या प्लॅटफॉर्मवर आपोआप उत्पन्नाच्या आधारे आयटीआर दाखल करण्याविषयी माहिती दिली जाते.
अशाप्रकारे ITR दाखल करा…
Step 1 : फॉर्म 16 अपलोड करा.
Step 2 : क्लिअरटॅक्स आपोआप तुमचा आयटीआर तयार करतो.
Step 3: आता तुम्हाला टॅक्ससंबंधीत डिटेल्स व्हेरिफाय करावे लागतील.
Step 4: पावती क्रमांक मिळविण्यासाठी ई-फाईल टॅक्स रिटर्न मिळेल.
Step 5: आता तुम्हाला नेट बँकिंगच्या माध्यमातून टॅक्स रिटर्नचे ई-व्हेरिफाय करावी लागेल.

MyITreturn : (File Income Tax Returns free of coast) :

MyITreturn ही आयकर विभागाकडे नोंदणीकृत वेबसाइट आहे. जी ग्राहकांना विनामूल्य टॅक्स फाइल करण्याची सुविधा देते. ग्राहकाला MyITreturn वेबसाइटवर आयटीआर फाईल करण्यासाठी काही बेसिक प्रश्नांची उत्तरे द्यावे लागतील. हे प्रश्न करदात्यांचा पगार, घर, गुंतवणूक याविषयांशी संबंधित असतील. या प्रश्नांद्वारे तुमच्या इनकम टॅक्सचे कॅलक्युलेशन केले जाते. (How to file income tax return free of cost)
Eztax :
Eztax सुद्धा मोफत टॅक्स रिटर्न फाइल करण्याची सुविधा देते. याबरोबर, कोणीही टॅक्स तयार करण्यासाठी फॉर्म 16 अपलोड करू शकतो. तसेच टॅक्स ऑप्टिमायझर रिपोर्ट मिळवू शकतो आणि विनामूल्य ई-फाईल करू शकतो. याबाबत Eztax च्या वेबसाइटवर पूर्णपणे माहिती आहे.

Quicko :
Quicko ने 100 टक्के विनामूल्य आयटीआर फाईल करण्याचा दावा केला आहे. वेबसाइटवर म्हटले आहे की, पगार आणि उत्पन्न असलेले लोक याद्वारे आयटीआर फायलिंग विनामूल्य करू शकतात.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: How to file income tax return free of cost in Marathi.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#IncomeTax(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या