30 April 2024 5:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 01 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 01 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या PSU Stocks | या PSU शेअरने अल्पावधीत दिला 200% परतावा! कंपनीबाबत सकारात्मक अपडेटने शेअर्स खरेदीसाठी गर्दी Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, झटपट 22 टक्केपर्यंत परतावा मिळेल REC Share Price | कमाईची संधी! 1 वर्षात 265% परतावा देणारा शेअर काही दिवसात देईल मोठा परतावा BHEL Share Price | मल्टिबॅगर PSU BHEL शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर NBCC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 265% परतावा, स्टॉक चार्ट काय संकेत देतोय?
x

राणेंचे वाक्य चुकले नाही, थोबाडीत मारली असती हा कॉमन संवाद | काल सहमत नसणारे चंद्रकांतदादा आज पलटले

Chandrakant Patil

मुंबई, २५ ऑगस्ट | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. यानंतर राज्यातील राजकारण पेटले आहे. मंगळवारी अवघ्या महाराष्ट्रात शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत राणेंविरोधात आंदोलने केली. असे असताना नारायण राणेंना अटक करण्यात आली. रात्री उशीरा त्यांना जामीनही देण्यात आला असला तरीही अजुनही शिवसेना-भाजप राज्यात आमने-सामने आल्याचेच चित्र दिसत आहे. दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे समर्थन केले आहे.

राणेंचे वाक्य चुकले नाही, थोबाडीत मारली असती हा कॉमन संवाद, काल सहमत नसणारे चंद्रकांतदादा आज पलटले – BJP state Chandrakant Patil reaction on Narayan Rane offensive statement on CM Uddhav Thackeray :

माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘राणेंचे वाक्य चुकलेले नाही, थोबाडीत मारली असती हा कॉमन संवाद आहे. असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘उद्धव ठाकरे देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होत आहेत हा संदर्भ देताना चुकले. यावर राणे साहेब मी शेजारी असतो तर थोबाडीत मारली असती असे म्हणाले होते. मात्र हा कॉमन संवाद आहे. ते थोबाडीत मारायला मातोश्रीवर जाणार आहेत, शोधून थोबाडीत मारणार आहे असे ते म्हणाले होते का?’ असा उलट सवालच चंद्रकांत पाटलांनी केला.

पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘मंगळवारी दिवसभरात झालेला राजकीय खेळ हा सूडबुद्धीने झाला असल्याचे सिद्ध झाले आहे. आता राणेंना जामीन देण्यात आला. एसपीकडे दोनदा हजेरी लावण्यास सांगण्यात आले आहे. त्यांना नोटीस देण्यात आली आणि यापुढे बोलत असताना सांभाळून बोलण्यास सांगितले आहे. सत्याचा विजय झालाय.’ असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: BJP state Chandrakant Patil reaction on Narayan Rane offensive statement on CM Uddhav Thackeray.

हॅशटॅग्स

#Chandrakant Patil(123)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x