3 May 2025 1:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

Parenting | मुलांकडून किती अपेक्षा करावी? | मुलांचा विकास कसा करावा? - नक्की वाचा

When parents expect too much from children

मुंबई, २९ ऑगस्ट | अपेक्षा करणे या मानवी भावना असतात आणि त्यामुळे त्या कोणाकडेही करणे साहजिक आहे पण पालक आणि मुले यांच्या नात्यात जेव्हा अपेक्षा येतात तेव्हा त्या नीट हाताळल्या पाहिजे. प्रत्येक पालकाची अपेक्षा हि मुलाच्या वाढत्या वयाबरोबर वाढली जाते. सुरुवातीला त्याने चांगले शिक्षण घेणे मग त्याने पायावर उभे राहणे आणि त्यानंतर चांगले जीवन जगणे. पण ह्या अपेक्षा काळजीपोटी असतात हे नक्की हे मुलांनी समजून घेतले पाहिजे . बऱ्याचदा यातून भांडण होताना दिसून येते कारण प्रत्येकाला स्वतःकडून सुद्धा काही अपेक्षा असतात आणि त्यामुळेच मतभेद वाढू शकतात.

मुलांकडून किती अपेक्षा करावी?, मुलांचा विकास कसा करावा? – When parents expect too much from children :

अशा गोष्टींना लक्षात ठेवून प्रत्येकाने एकमेंकांना अपेक्षांचे आणि विचारांचे स्वातंत्र्य दिले पाहिजे तेव्हाच जाऊन एकमेंकाचे नाते घट्ट होईल. मुलांच्या वयाची पहिली 8 वर्षे अतिशय महत्वाची असतात, त्यांत ही पहिली 3 वर्षे. भावी काळातील आरोग्य, वाढ आणि विकासाचा पाया ह्या वर्षांमध्ये घातला जातो. ह्या कालावधीमध्ये मुलांचा शिकण्याचा वेग सर्वाधिक असतो. किशोर आणि लहान मुलांना प्रेम, वात्सल्य, प्रोत्साहन व मानसिक पातळीवरील चालना तसेच आरोग्य संगोपन व पोषक आहार मिळाल्यास ती उत्साहाने शिकतात.

मुलांचा विकास आणि आरंभिक शिक्षण:

मुलांचा विकास आणि आरंभिक शिक्षणाबाबत प्रत्येक कुटुंबास व संप्रदायास कोणती माहिती मिळण्याचा हक्क आहे.
* वयाच्या पहिल्या 8 वर्षांमध्ये घेण्याेत आलेली काळजी व संगोपन, विशेषत: पहिल्या 3 वर्षांतील, अत्यंत महत्वाचे असते आणि त्याच्या किंवा तिच्या आयुष्यावर ह्याचा प्रभाव पडतो.
* मुले जन्म घेतल्या क्षणीच शिकू लागतात. त्यांना योग्या आरोग्य संगोपन व पोषक आहार तसेच प्रेम, वात्सल्य, प्रोत्साहन व मानसिक पातळीवरील चालना मिळाल्यास ती उत्साहाने शिकतात आणि वाढतात.
* मुलांना खेळण्यास प्रोत्साहन दिले व त्यांचे कुतूहल जागृत ठेवले की त्यांची सामाजिक, भावनिक तसेच बौद्धिक पातळी वरील वाढ व विकास व्यवस्थित होतो.
* मुले त्यांच्या जवळ असणार्या व्यक्तींच्या वागण्याचे अनुकरण करून त्यानुसार वागणे शिकतात.
* मुलाची वाढ व विकास खुंटत असल्याचे धोक्याथचे संकेत पालकांना व संगोपनकर्त्यां ना ओळखता येणे आवश्यक आहे.

Things Parents Should Stop Expecting For Their Children :

जन्मानंतरच्या पहिल्या एका तासात होणारा आईचा स्पर्श व मिळणारे आईचे दूध ह्यामुळे बालकाचे व आईचे नाते घट्ट होऊन चांगल्या विकासास व वाढीस चालना मिळते. स्पर्श, ऐकणे, वास येणे, पाहणे व चव घेणे ह्या पाच गोष्टींद्वारे मूल त्याच्याभोवतीच्या जगाचा अभ्यास करू लागते. मुलांशी बोलण्याने, त्यांना स्पर्श केल्याने व जवळ घेण्याने, परिचित चेहरे दिसल्याने, ओळखीचे आवाज ऐकू आल्याने व विविध वस्तू हाताळण्यामुळे त्यांचा मानसिक विकास झपाट्याने होतो. जन्मापासूनच सुरक्षित वातावरण व प्रेम मिळाल्याने आणि कुटुंबियांशी संवाद साधण्याभने मुले वेगाने शिकतात. सुरक्षिततेची ही भावना मिळालेली मुले शाळेत चांगली प्रगती दाखवतात तसेच जीवनातील अडचणींवर सामान्यळत: अधिक चांगल्या प्रकारे मात करू शकतात.

पहिले 6 महिने, बाळाच्या इच्छेनुसार पाजलेले आईचे दूध, सहा महिने वयानंतर मिळणारा सुरक्षित व पोषक असा पूरक आहार व त्याचबरोबर दोन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त काळापर्यंत चालू ठेवलेले स्तनपान ह्यामुळे मुलांची तब्येत तर चांगली राहतेच शिवाय त्यांना आईचे प्रेमदेखील लाभते. मुलांच्या वाढी व विकासासाठी सर्वांत महत्वाचा मार्ग म्हणजे त्यांचा इतरांशी येणारा संपर्क. पालक व संगोपनकर्ते जितक्या जास्त वेळा मुलाशी बोलतील आणि त्याच्या शंकांना प्रतिसाद देतील तितके ते अनेक गोष्टी चटकन शिकेल.

पालकांनी किंवा संगोपनकर्त्यां नी बालकाशी बोलणे, गाणे म्हणून किंवा वाचून दाखवणे गरजेचे आहे. मुलांना प्रत्यक्ष शब्दार्थ समजला नाही तरी अशा तर्हेच्या ‘संवादा’ द्वारे त्यांची भाषाकौशल्ये व आकलनक्षमतेचा विकास होतो. संगोपनकर्त्यांयनी लहान मुलांना सतत नवनवीन वस्तू पहायला, ऐकायला, खेळायला व हाताळायला देवून त्यांरना वेगाने शिकण्यास व समजून घेण्यारस मदत करावी.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: When parents expect too much from children.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Parenting(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या