27 April 2024 2:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP Top-Up | SIP टॉप-अप करून चौपट कमाई करा, SIP रु. 2000 आणि मिळतील 17 लाख 36 हजार रुपये Yes Bank Share Price | एका वर्षात 67 टक्के परतावा देणाऱ्या येस बँक शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही, दिले फायद्याचे संकेत IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत, स्टॉकला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट Vedanta Share Price | कमाईची सुवर्ण संधी! वेदांता शेअर्स अल्पावधीत देईल 40 टक्के परतावा, वेळीच फायदा घ्या PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर! एका वर्षात 450% परतावा दिला, स्टॉक चार्टवर पुन्हा तेजीचे संकेत Bonus Shares | फ्री शेअर्सचा पाऊस पडणार, फायदा घ्या! ही कंपनी 1 शेअरवर 3 फ्री बोनस शेअर्स देणार Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्र गुंतवणूकदारांची चांदी, लाभांश जाहीर, शेअर्स खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी
x

गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबईतील दादर मार्केटमध्ये खरेदीसाठी तूफान गर्दी

Ganesh Utsav

मुंबई, ०९ सप्टेंबर | मुंबईत मोठ्या थाटामाटात गणेशोत्सव साजरा केला जातो. गणेशोत्सव एका दिवसावर आला आहे. त्यामुळे भाविकांनी खरेदीसाठी मार्केटमध्ये गर्दी केली आहे. मार्केटमधील गर्दी पाहिल्यास कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास येत आहे.

गणेशोत्सावाच्या निमित्ताने मुंबईतील दादर मार्केटमध्ये खरेदीसाठी तूफान गर्दी – Huge crowed at Mumbai Dadar Market for Ganesh Utsav shopping :

मुंबईत सुमारे दोन लाखाहून अधिक घरगुती आणि सार्वजनिक गणेश मूर्तीचे पूजन केले जाते. गणेशोत्सव साजरा करताना सजावट, फुलांची आरास केली जाते. फुले, हार, सजावटीचे साहित्य आदीच्या खरेदीला भाविक दादर येथील मार्केटमध्ये येतात. उद्यापासून गणेशोत्सव (10 सप्टेंबर) साजरा केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर आज सकाळपासून दादरच्या मार्केटमध्ये भाविकांनी खरेदीसाठी प्रचंड गर्दी केलेली पाहायला मिळत आहे. मुंबईत कोरोनाचे निर्बंध लागू असताना महापालिका व पोलीस प्रशासनाने या गर्दीकडे दुर्लक्ष केल्याने रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गर्दी टाळण्याचे आवाहन:
देशभरात सण साजरे करताना होणाऱ्या गर्दीमधून कोरोना पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकारने सणांमध्ये होणाऱ्या गर्दीवर निर्बंध आणावेत, अशा सूचना राज्य सरकारला दिल्या आहेत. केरळमध्ये ओनम सणानंतर कोरोना रुग्णसंख्या वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन केले आहे. तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ऑनलाईन दर्शनाची सोय करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Huge crowed at Mumbai Dadar Market for Ganesh Utsav shopping.

हॅशटॅग्स

#Mumbai(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x